

आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न
प्रमोद चांदुरकर : डेरवणमध्ये मिनी राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ : धनुर्विद्या या खेळात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील अधिक खेळाडू देशस्तरावर खेळत आहेत. सद्यःस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर धनुर्विद्येत बलाढ्य असलेल्या कोरिया, युरोप, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यांच्या तुलनेत अधिक उत्कृष्ट खेळाडू तयार करण्याचा आमचा मानस आहे, असे प्रतिपादन धनुर्विद्येतील पहिले खेळाडू व वर्ल्ड आर्चरी एशियाचे बोर्ड मेंबर व महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनचे सचिव प्रमोद चांदुरकर यांनी केले.
सावर्डे येथील डेरवण क्रीडा संकुलात सुरू असलेल्या १६व्या मिनी राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्य स्पर्धेच्या निमित्ताने बोलत होते. ते म्हणाले, धनुर्विद्येत महाराष्ट्रात अनेक खेळाडू असून, महाराष्ट्राने आतापर्यंत देशस्तरावर धनुर्विद्येचे अनेकवेळा नेतृत्व केलेले दिसून येते. या स्पर्धेच्या निमित्ताने वय वर्ष १०, १३ व १५ अशा वयोगटातील खेळाडूंना चांगले मार्गदर्शन करत येणाऱ्या २०३२ व ३६च्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी त्यांना तयार करण्याचा आमचा मानस आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने स्पोर्टस् सायन्स म्हणजेच खेळाडूला खेळताना उद्भवणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्यांवर उत्कृष्ट मार्गदर्शन करून या खेळासाठी चांगला शारीरिक विकास करून तो या खेळासाठी अधिक सक्षम कसा बनेल याचे देखील पाठ या मैदानावर गिरवले जात आहेत. या तीन दिवसात राज्यभरातील तब्बल १५०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत.
चौकट
डेरवण क्रीडा संकुलात सर्व सुविधा
डेरवण क्रीडा संकुलात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा उत्कृष्ट संघ कसा घडवता येईल, हे उद्दिष्ट सद्यःस्थितीत आमच्यासमोर आहे. संस्थेच्यावतीने नेहमीच खेळाडूंसाठी प्रोत्साहन दिले जाते. त्याबद्दल चांदुरकर यांनी एसव्हीजेसीटी संस्थेचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.