मानाचा कुणबी चषक बलदेवाडी संघाने पटकावला

मानाचा कुणबी चषक बलदेवाडी संघाने पटकावला

Published on

-Rat४p२३.jpg ः
२५N४९०५०
विरार ः बलदेवाडी संघास कुणबी चषक देऊन गौरविताना मनोज घागरूम, हेमंत शिगवण.
----
कुणबी चषक बलदेवाडी संघाने पटकावला
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ४ ः मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्यावतीने नारंगी मैदान विरार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला मानाचा कुणबी चषक हा बलदेवाडी संघाने पटकावला तर साखरी संघ उपविजेता संघ ठरला. तृतीय आंबवली, चतुर्थ पन्हळी बुद्रुक संघ ठरला.
कुणबी क्रीडा असोसिएशनच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे कुणबी चषक २०२५चे भव्यदिव्य आयोजन नारंगीच्या मैदानावर करण्यात आले होते. पारितोषिक वितरणाला कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष मनोज घागरूम, समाजनेते भाई पोस्टुरे, सुनील शिगवण, रघुनाथ पोस्टुरे, मारूती पालणकर, मुरलीधर बैकर, क्रीडाप्रमुख अनंत रटाटे, विनोद गोठल, अध्यक्ष हेमंत शिगवण व सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. स्पर्धेच्या प्रत्येक सामन्यातील सामनावीरास सन्मानचिन्ह व टीशर्ट देऊन गौरवण्यात आले. विजेत्यांना रोख रक्कम व चषक देण्यात आला. सर्वोत्कृष्ट गोलंदाज- राज चव्हाण (साखरी), सर्वोत्कृष्ट फलंदाज- समीर सावंत (बलदेवाडी), मालिकावीर- राजदीप भुवड (बलदेवाडी), सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज - अथर्व लोंढे (पालेगाव) यांना गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com