लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीला भरघोस बक्षिसे

लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीला भरघोस बक्षिसे
Published on

-rat४p३५.jpg-
२५N४९१२१
सावंतवाडी : येथे आयोजित कोकण विभागीय परिषदेत भरघोस बक्षिसे मिळवणारे लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे पदाधिकारी.
-----
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे यश
कोकण विभागीय परिषद ; सर्वाधिक १६ पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : सावंतवाडी येथे लायन्स इंटरनॅशनलच्या कोकण विभागाची विभागीय परिषद पार पडली. विभागीय प्रमुख गजानन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली. या परिषदेत एकूण १८ क्लबमध्ये सदस्यसंख्या ३० पेक्षा जास्त असलेल्या गटात सर्वाधिक १६ पुरस्कार लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी व‌ लिओ क्लब ऑफ रत्नागिरीने पटकावले.
एकूण १८ क्लबचा मिळून असा हा कोकण विभाग आहे. यामध्ये माजी झोन चेअरमन श्रेया केळकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी अध्यक्ष शिल्पा पानवलकर यांना क्लब एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यमान अध्यक्ष गणेश धुरी यांना सर्वोत्कृष्ट अध्यक्ष, सचिव विशाल ढोकळे यांना सर्वोत्कृष्ट सचिव, खजिनदार अमेय वीरकर यांना सर्वोत्कृष्ट खजिनदार, बेस्ट क्लब हे मानाचे सर्व पुरस्कार प्रदान करण्यात आले. बेस्ट कॅबिनेट ऑफिसर म्हणून सुनीलदत्त देसाई, एक्सलन्स परफॉर्मन्स म्हणून लायन पराग पानवलकर, ओंकार फडके, नवीन सदस्य शरद नागवेकर यांना प्रदान करण्यात आले. बेस्ट रिजन चेअरमन व्हिजिटचा पुरस्कार क्लबला देण्यात आला. लायन्स सन्मान डॉ. संतोष बेडेकर, सुधीर वणजू, हेल्पफूल पर्सनॅलिटी म्हणून श्रेया केळकर यांनाही सन्मानित करण्यात आले. अध्यक्ष गणेश धुरी यांना एमजेएफ झाल्याबद्दल बहुप्रांतीय पिन देऊन सन्मानित करण्यात आले.
या परिषदेत लिओ क्लब ऑफ रत्नागिरीलासुद्धा मानाचे दोन पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट लिओ म्हणून अध्यक्ष श्रेयस रसाळ, सर्वोत्कृष्ट सचिव म्हणून गिरिजा घनवटकर यांना सन्मानित करत लिओ क्लब ऑफ रत्नागिरीचे काम कौतुकास्पद आहे, असे नमूद करण्यात आले. परिषदेत लायन्स प्रांत ३२३४ जी १ चे प्रांतपाल ॲड. एम. के. पाटील, उपप्रांतपाल डॉ. विरेंद्र चिखले, विभागीय प्रमुख गजानन नाईक, परिषद अध्यक्ष संतोष चोडणकर, उपविभागीय प्रमुख डॉ. नीलेश पाटील, माजी प्रांतपाल केशव फाटक, दूरदर्शनचे निवृत्त निर्माते जयू भाटकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com