

उधना ते मंगळुरू
जादा रेल्वे धावणार
कणकवली ः होळी उत्सव आणि उन्हाळी हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेतर्फे विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. उधना जंक्शन ते मंगळुरू जंक्शन अशी द्वि-साप्ताहिक विशेष गाडी ‘कोरे’ मार्गावर धावणार आहे. गाडी क्रमांक ०९०५७ उधना जंक्शन ते मंगळुरू जंक्शन द्वि-साप्ताहिक विशेष गाडी २ मार्च ते २९ जूनपर्यंत दर बुधवार आणि रविवारी रात्री ८ वाजता उधना जंक्शन येथून सुटेल. परतीसाठी गाडी क्रमांक ०९०५८ मंगळुरू जंक्शन ते उधना जंक्शन द्वि-साप्ताहिक विशेष मंगळुरू जंक्शन येथून ३ मार्च ते ३० जूनपर्यंत गुरुवार आणि सोमवारी रात्री १०.२२ वाजता सुटेल. ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, करमळी, मडगाव, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड, बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल स्थानकावर थांबेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.