काताळे ग्रामपंचयातीच्या इमारतीचे उदघाटन
काताळे ग्रामपंचयात इमारतीचे उदघाटन
गुहागर, ता. ४ ः तालुक्यातील काताळे, तवसाळ, तवसाळ खुर्द या तीन महसुली गावांचा समावेश असणाऱ्या काताळे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर, सरपंच प्रियांका सुर्वे उपस्थित होते.
२०१० साली माजी आमदार नातू यांच्या विशेष प्रयत्नाने पडवे ग्रामपंचायतीच्या पडवे आणि काताळे अशा २ ग्रामपंचायती निर्माण झाल्या. ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यानंतर ज्या महसूल गावाची लोकसंख्या जास्त त्याप्रमाणे नवीन ग्रामपंचायतला काताळे हे नाव मिळाले आणि काताळे गावातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या मनाने ग्रामपंचायत कार्यालयाला विनामोबदला जागा आणि इमारत तयार करून दिली. या ग्रामपंचायतीला २२ लाखांचा निधी जिल्हा नियोजन जनसुविधा योजनेतून प्राप्त झाला. अधिक ३ लाख रुपये ग्रामनिधी अशी २५ लाखाची दिमाखदार इमारत काताळे महसुली गावात उभी राहिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

