पावस-निरुळमधील आगीत ८० किलो भात खाक

पावस-निरुळमधील आगीत ८० किलो भात खाक

Published on

-rat4p40jpg
49170
पावस ः निरूळ ठीकवाडी येथे गवताच्या उडवीला लागलेली आग.

rat4p41.jpg
N49171
उडवीत ठेवलेल्या भाताच्या पिशव्या.
----

निरुळमध्ये आगीत ८० किलो भात खाक
दोन शेतकऱ्यांचे नुकसान; गवतही जळले
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ४ ः रत्नागिरी तालुक्यातील निरूळ-ठीकवाडी येथे अज्ञाताने आग लावल्याने दोन शेतकऱ्यांचे गवत आणि त्यामध्ये ठेवलेले ८० किलो भात जळून खाक झाले. अग्निशमन दल तातडीने दाखल झाल्याने आणखी नुकसान टळले.
ठीकवाडी येथे मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास आग लागली. याबाबत नरेश ठीक यांनी ठिकवाडीतील ग्रामस्थांना कळवले. आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी तत्काळ घटना ठिकाणी धाव घेतली व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम चालू केले. आगीमध्ये अनिल अनंत ठीक व अशोक भिकाजी ठीक यांचे गवतामध्ये ठेवलेले भात आणि गवत जळून खाक झाले. याबाबत पोलिसपाटील नीलेश ठीक यांनी पोलिस ठाणे, फिनोलेक्स कंपनीचे अग्निशमन दल यांना कळवले. त्यानंतर अर्ध्या तासातच फिनोलेक्स कंपनीचा बंब घटनास्थळी दाखल झाला आणि त्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली; परंतु या आगीमुळे ८० किलो भात जळून खाक झाल्याने दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
------
चौकट
उडवीत ठेवतात भाताच्या पिशव्या
या परिसरामध्ये भातकापणीच्या वेळी भाताची झोडणी केल्यानंतर भाताची उडवी रचली जाते. त्यावेळी भाताच्या पिशव्या भरून या गवतामध्ये ठेवण्याची पद्धत आहे. त्यामुळे भात चांगले राहते, असे म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com