खेड-क्राईम

खेड-क्राईम

Published on

दागिन्यांच्या पर्सची
रेल्वेतून चोरी
खेड ः कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेस गाडीतून कणकवली ते खेड रेल्वेस्टेशन असा प्रवास करत असताना शालिनी भिकाजी नेरकर यांची पर्स चोरट्याने चोरली. त्या झोपलेल्या असताना पर्स व त्यातील सोन्याच्या तारेची नथ, मोबाईल आदी ऐवज लंपास केला. हा ऐवज २६ हजारांचा होता. ही चोरी २ मार्चला रात्री ९ वाजता कणकवली ते खेड रेल्वेस्टेशन दरम्यान घडली. शालिनी नेरकर (६०, रा. नेरूळ, नवी मुंबई) यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार खेड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काडवलीमधून
ब्रेकर मशीन चोरले
खेड ः तालुक्यातील काडवली-गजवाडी येथे नवीन सार्वजनिक विहिरीच्या खोदाईसाठी ठेवलेले १० लाखांचे ब्रेकर मशिन चोरट्याने चोरल्याची तक्रार येथील पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. ही घटना १ ते २ मार्च या कालावधीत घडल्याचे प्रल्हाद प्रकाश लाड यांनी तक्रारीत नमूद केले आहे. लाड यांच्या मालकीचे जेसीबी मशिन नवीन सार्वजनिक विहिरीच्या खोदाई कामासाठी ठेवले होते. तीन टन वजनाच्या मशिनसह इतर सुटे भाग चोरट्याने लांबवले. मशिन चोरीस गेल्याचे निदर्शनास येताच पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com