उपाययोजनांसाठी कुंभार्ली घाटाची लवकरच पाहणी
- rat४p४३.jpg-
२५N४९१७३
चिपळूण ः कुंभार्ली घाटातील सुरक्षेविषयी कार्यकारी अभियंत्यांबरोबर चर्चा करताना सर्वपक्षीय पदाधिकारी.
------
कुंभार्ली घाटाची उपाययोजनेसाठी होणार पाहणी
सर्वपक्षीय एकवटले ; कार्यकारी अभियंत्यांबरोबर सकारात्मक चर्चा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः कुंभार्ली घाटात वारंवार होणाऱ्या अपघातामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटात लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी सर्व पक्षातील नेत्यांनी कार्यकारी अभियंता रामसे यांच्याकडे केली. तसेच प्रत्यक्ष घाटाची पाहणी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले
अधिकाऱ्यांशी संवाद साधताना काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शाह, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष विनोद झगडे, जयंत खताते, शौकत मुकादम, विश्वनाथ डोळस, महादेव चव्हाण, विजय साळुंखे, केशव लांबे, राजाभाऊ नारकर, बाबा चव्हाण, तुळशीराम पवार, सुरेश पाथरे, राकेश शिंदे, संजय जाधव, अनिल शिंदे, खालिद पटाईत आदी उपस्थित होते. कुंभार्ली घाटातील अनेक प्रश्न, रस्त्यालगत असलेली संरक्षक भिंतीचे काम, गटारे, तोडण्यात आलेली झाडे, घाटातील मोडकळीस आलेले कठडे, त्यांची उंची वाढविण्याचा प्रश्न या विषयांवर जवळपास दीड तास चर्चा झाली. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात येणार आहे. तसेच घाटातील परिस्थितीची संयुक्तरित्या पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुहागर-विजापूर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडे वर्ग करण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावळे सर्वानुमते ठरले आहे. तसेच कुंभार्ली घाटातील उपाययोजनांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्याचे कार्यकारी अभियंता रामसे यांनी सांगितले.
----
अवजड वाहतूक बंद करा
कुंभार्ली घाटातील अवजड वाहतूक सायंकाळी ६ वाजल्यानंतर बंद करा अशी मागणीही चिपळूणवासीयांनी केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री, स्थानिक आमदार आणि पालकमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे हा प्रश्न मांडण्याचे ठरविण्यात आले.
---
कोट
तालुक्यात निर्माण होणाऱ्या कोणत्याही समस्येसाठी याचप्रकारे सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी एकत्र यायला पाहिजे.
- भरत लब्धे, जिल्हा उपाध्यक्ष, कॉंग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

