रामगडच्या वृद्धेचा आडवलीत मृतदेह

रामगडच्या वृद्धेचा 
आडवलीत मृतदेह
Published on

रामगडच्या वृद्धेचा
आडवलीत मृतदेह

आचरा, ता. ४ : रामगड येथून पंधरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मनोरुग्ण वृद्धेचा मृतदेह आडवली हायस्कूलच्या मागे घडघडी ओहोळात कुजलेल्या स्थितीत सोमवारी (ता. ३) दुपारी आढळला. तिच्या नातेवाइकांना पाचरण करत ओळख पटविण्यात आली. आचरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.
आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामगड बाजारपेठ येथील सुनीता विठ्ठल वेर्णेकर (वय ७६) चुलत नातेवाइकांकडे आश्रयास होत्या. त्या मनोरुग्ण होत्या. घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडून बराच कालावधी घराबाहेर राहत असत. १५ दिवसांपूर्वी त्या निघून गेल्या होत्या. दरम्यान, सोमवारी (ता. ३) दुपारी आडवली ओहोळात कुजलेल्या स्थितीत मृतदेह असल्याची माहिती पोलिसपाटलांनी आचरा पोलिसांना दिली. बाजूला असलेले कपडे आणि वस्तूंवरून तो मृतदेह सुनीता वेर्णेकर यांचा असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. या घटनेची खबर नातेवाईक सुनील वासुदेव तारी (रा. रामगड) यांनी आचरा पोलिसांत दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल कांबळे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com