उभ्या ट्रकला धडक बसून
दुचाकीवरील दोघे गंभीर

उभ्या ट्रकला धडक बसून दुचाकीवरील दोघे गंभीर

Published on

उभ्या ट्रकला धडक बसून
दुचाकीवरील दोघे गंभीर

ओसरगाव टोलनाका येथील घटना

कणकवली, ता. ४ : उभ्या असलेल्‍या ट्रकला मागाहून धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना ३ मार्च रोजी सकाळी दहा वाजता घडली. शिवाजी पांडुरंग घाडीगावकर (वय ५२) आणि निखिल गुणाजी घाडीगावकर (दोघेही रा. वागदे नमसवाडी), अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी ट्रक चालकावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पडवे (ता. कुडाळ) येथे सेंट्रिंग कामासाठी शिवाजी आणि निखिल हे दोघे ३ मार्च रोजी ते पडवे येथून वागदे येथे दुचाकी (एमएच ०५ अेआर ८६६२) घेऊन निघाले होते. महामार्गावरील ओसरगाव येथील टोलनाका परिसरात ट्रक (एमएच १२ क्युजी ३०४४) उभा करून ट्रक चालक राहुल हनुमंत बर्गे (वय ३४, रा. सातारा) हा तेथील एका हॉटेलमध्ये चहा नाष्ट्यासाठी गेला होता. टोल नाक्‍यावर उभ्या ट्रकचा अंदाज न आल्‍याने वेगाने येणारी दुचाकी ट्रकच्या मागील बाजूस धडकली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी जखमींना तातडीने ओरोस येथील उपजिल्‍हा रुग्‍णालयात दाखल केले. याप्रकरणी ट्रक चालक राहुल बर्गे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com