प्रशांत यादव यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

प्रशांत यादव यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
Published on

प्रशांत यादव यांची उच्च न्यायालयात याचिका
विधानसभा निवडणूक ; भाषणांसह विविध मुद्द्यांवर जोर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः विधानसभा निवडणुकीत केलेल्या भाषणांसह अन्य विविध मुद्यांबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेत दाखल केली आहे. या प्रकरणी आमदार शेखर निकम यांच्यासह अन्य उमेदवारांना न्यायालयाने समन्स बजावले आहे.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाची निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी झाली. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले होते. अटीतटीच्या लढतीत मतमोजणीवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर फेरमतमोजणीचीही मागणी केली होती. त्यानुसार फेरमतमोजणीतही आमदार निकम हेच विजयी झाले. मात्र प्रशांत यादव यांनी तीन महिन्यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत आमदार शेखर निकम यांनी ग्रामपंचायतींना संगणक वाटले, मानहानीकारक भाषण केले अशा मुद्यांवर याचिका दाखल केली. ही याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने आमदार शेखर निकम यांच्यासह उमेदवार अनघा कांगणे, प्रशांत भगवान यादव, महेंद्र जयराम पवार, शेखर गंगाराम निकम यांच्यासह निवडणूक आयोगालाही समन्स बजावले आहेत. तसेच त्यांना म्हणणे मांडण्यासाठी अवधी दिला आहे. अॅड. सुजय हेमंत गांगल हे मुंबई उच्च न्यायालयातील वकील असून, त्यांच्यामार्फत समन्स बजावण्यात आले आहे.
------
कोट
विरोधी उमेदवाराने निकालाच्या दिवशी पुन्हा मतमोजणीची मागणी केली ती मान्य झाली. आता तीन महिन्यानंतर न्यायालयात जायचे, काहीही आरोप करायचे हे योग्य नाही. आम्ही आमचे म्हणणे कोर्टापुढे मांडणार आहोत.
- शेखर निकम, आमदार, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com