सावंतवाडीत बॅगेतील ६० हजार चोरीस
सावंतवाडीत परप्रांतीयांच्या
बॅगेतील ६० हजार चोरीस
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ : शहरातील मुंबई-गोवा महामार्गावरील बाहेरचावाडा नायरा पेट्रोल पंपासमोर असलेल्या एका इमारतीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या तिघा परप्रांतीयांच्या खोलीत ठेवलेल्या बॅगेतून साठ हजारांची रक्कम चोरीस गेली. पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिल्यानंतर आज सकाळी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले; मात्र काहीच निष्पन्न झाले नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघे संशयित कैद झाले असून, त्यांचे चेहरे अस्पष्ट दिसत असल्याने ओळख पटत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेरचावाडा नायरा पेट्रोल पंपासमोर असलेल्या रफिक नाईक यांच्या मालकीच्या घरात वरच्या मजल्यावर भाड्याच्या घरात परप्रांतीय व्यापारी राहतात. त्यांनी आपल्या बॅगेमध्ये ६० हजारांची रक्कम ठेवली होती. सोमवारी (ता. ३) दुपारी त्या घरात आलेल्या अज्ञात तिघांपैकी कोणीतरी ती रक्कम चोरली. यात साडी विक्री व्यावसायिक सोमू कुरेशी याच्या बॅगेतून ५० हजार, तर गादी व्यावसायिक साजिद मेवाती यांचे १० हजार असे मिळून ६० हजार चोरीस गेले. शोधाशोध करूनही रक्कम न सापडल्याने सोमवारी उशिरा सोमू कुरेशी याने पोलिस ठाण्यात धाव घेत चोरीची फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात तपास केला. यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन व्यक्ती मजल्यावर जाताना दिसत आहेत; परंतु त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आज ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले; मात्र त्यात काहीच निष्पन्न झाले नाही. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिस तपास करत आहेत. ही रक्कम माहितगार व्यक्तींनी चोरली असावी, असा पोलिसांना संशय आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करीत आहेत. भर दिवसा झालेल्या चोरीच्या प्रकाराने सारेच अवाक झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

