अनिता नारकर यांना सुपर मॉम पुरस्कार प्रदान

अनिता नारकर यांना सुपर मॉम पुरस्कार प्रदान
Published on

rat8p10.jpg
49924
रत्नागिरी : आस्था सोशल फाउंडेशनतर्फे सुपर मॉम पुरस्कार अनिता नारकर यांना प्रदान करताना सम्राज्ञी चाळके. डावीकडून आत्माराम नारकर, आरती, नारकर आणि सुरेखा पाथरे.

अनिता नारकर यांना
सुपर मॉम पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १०: आस्था सोशल फाउंडेशनने जागतिक महिलादिनानिमित्त २०२५ वर्षाकरिता मॅरेथॉनमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आरती नारकर हिची आई अनिता नारकर यांना सुपर मॉम पुरस्कार देऊन शनिवारी सन्मानित केले. सम्राज्ञी चाळके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला.
नारकर या गिरणी कामगाराच्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, त्यांचे शिक्षण मुंबई येथे झाले. मुंबई महानगर पालिका येथे त्यांनी १९७८ ते २०१४ या प्रदीर्घ कालावधीत सेवा बजावली. त्यांची कन्या आरती ही बौद्धिक अक्षम प्रकारातील दिव्यांग आहे.
घरातील कामे ती उत्तमरित्या आवडीने करते. तिने मॅरेथॉन खेळामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. समाजसेवेची आवड व आपल्या मुलीचे अपंगत्व यामुळे नारकर यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर २०१८ साली चिपळूण तालुक्यातील पेढे येथे आरती निराधार सेवा फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. संस्थेने ४७ वृद्ध, दिव्यांग, निराधार व पीडित महिलांना आधार दिला आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com