वासुदेव सावंत स्मृती जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ
rat8p11.jpg-
N49925
रत्नागिरी : येथे जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करताना अॅड. कल्पलता भिडे व विजय भिडे.
वासुदेव सावंत स्मृती जिल्हास्तरीय
क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित सहाव्या जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेला येथील मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीत सुरवात झाली. (कै.) वासुदेव शिवराम सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा आयोजित केली आहे. २१ वर्षांखालील या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचा प्रारंभ (कै.) वासुदेव सावंत यांच्या कन्या अॅड. कल्पलता भिडे, शैलेश सावंत, विजय भिडे यांच्या उपस्थितीत झाला. रत्नागिरी, मंडणगड, चिपळूण, संगमेश्वर इत्यादी तालुक्यांतील खेळाडूंसह जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव विवेक सोहनी, आयोजक चैतन्य भिडे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील लहान वयाच्या व युवा खेळाडूंना क्लासिकल डाव लिहून खेळण्याची संधी मिळावी, या हेतूने ही दोन दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एकूण सहा फेऱ्यांमध्ये स्विस लीग पद्धतीने बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार स्पर्धा घेतली जाईल. जागतिक बुद्धिबळ संघटनेचे क्लासिकल फिडे मानांकन असलेल्या जिल्ह्यातील चार खेळाडूंसह एकूण छत्तीस बुद्धिबळपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
चौकट
खेळाडूंना संधी
बहुतांश ठिकाणी बुद्धिबळाच्या जलद व अतिजलद स्पर्धाच मोठ्या प्रमाणात चालू आहेत. खेळाडूंना क्लासिकल प्रकारात विचार करायला अधिक वेळ मिळतो व खेळ विकसित होण्यासाठी मदत होते. रत्नागिरी जिल्ह्यात क्लासिकल बुद्धिबळाचा प्रसार व्हावा, या हेतूने अशा विविध स्पर्धांचे आयोजन जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

