एक भाऊ घोषणा देतो, दुसरा वस्तुस्थिती मांडतो

एक भाऊ घोषणा देतो, दुसरा वस्तुस्थिती मांडतो

Published on

03322

एक भाऊ घोषणा देतो,
दुसरा वस्तुस्थिती मांडतो

उपरकर : पालकमंत्र्यांवर टीका, नीलेश राणेंचे कौतुक

कणकवली, ता. ९ : ‘जिल्ह्यातील विविध विकासात्मक प्रश्न आणि सरकारची आर्थिक स्थिती काय आहे, याबाबत आमदार नीलेश राणे यांनी वस्तुस्थिती विधानसभा सभागृहात मांडली. श्री. राणे यांनी जी वस्तुस्थिती मांडली तीच आम्ही गेले काही दिवस मांडत आहोत. याचाच अर्थ आम्ही जे सातत्याने मांडत आहोत. ते आमदार नीलेश राणे यांनी मान्य केले. याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, एक भाऊ केवळ घोषणा देतो आणि दुसरा भाऊ वस्तुस्थिती मांडतो,’ अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.
याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘जिल्ह्यातील विकासात्मक प्रश्न, रस्त्यांची कामे, नगरपंचायतींना मिळणारा निधी, सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत ठेकेदारांची प्रलंबित देयके अशा एकूण अनेक प्रश्नांबाबत नीलेश राणे यांनी विधानसभेच्या सभागृहात वस्तुस्थिती मांडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामांना येणारा अपुरा निधी, प्रलंबित असलेली विकासकामे याबाबत आम्ही विरोधी पक्ष म्हणून सातत्याने आवाज उठवितो. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून केवळ आश्वासने व घोषणांच्या पलीकडे काहीच होत नाही. म्हणूनच विधिमंडळात आमदार नीलेश राणे यांनी सत्ताधारी आमदार असतानाही ही वस्तुस्थिती मांडली, त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदनच करतो. श्री. राणे यांनी सभागृहात सरकारच्याच कार्यपद्धतीची चिरफाड करताना मुंबई-गोवा महामार्गाबाबतही काही मुद्दे उपस्थित केले. आमचे म्हणणे आहे की, त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना या महामार्गावर वस्तुस्थिती दाखविण्यासाठी आणून आपली परखड भूमिका मांडावी त्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. त्यांना आमचा पाठिंबाच राहील.’’
---
आराखड्यातील ४०० कोटी आणाल का?
‘‘सिंधुदुर्गातील जनतेला गेली काही वर्षे केवळ घोषणा आणि आश्वासनांचा पाऊसच पाहायला मिळत आहे. आता तर ज्या आमदारांनी वस्तुस्थिती मांडली. त्याच आमदारांचे भाऊ सत्ताधारी मंत्री असून ते केवळ घोषणाच करताना दिसतात. अशा परिस्थितीत जिल्हा विकास आराखड्याचे जाहीर केलेले ४०० कोटी रुपये पालकमंत्री आणू शकणार का? हा प्रश्न आहे. अशा स्थितीत आमदार श्री. राणे आणि जिल्हा विकासाच्या दृष्टीने मांडलेली भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांनी याच भूमिकेवर कायम राहत जिल्ह्यासाठी विकास निधी आणावा,’’ असेही श्री. उपरकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com