मुंबई-गोवा महामार्गावर अडथळ्यांची शर्यत !
मुंबई - गोवा महामार्गावर अडथळ्यांची शर्यत !
इंट्रो
मुंबई-गोवा महामार्गावरील मोजक्याच टप्प्यातील काम मागील सतरा वर्षांपासून रखडलेले आहे. राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतची मुदत दिलेली होती. ती आता डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे; परंतु सद्य:स्थितीत कामाची प्रगती पाहता दिलेल्या मुदतीमध्येही महामार्ग पूर्ण होणे शक्य नाही. याबाबत जनआक्रोश समितीकडूनही महामार्गाच्या परिस्थितीची पाहणी केली होती. कोकणातील शिमगोत्सव सुरू होत असल्यामुळे चाकरमानी याच महामार्गावरून प्रवास करीत कोकणात दाखल होणार आहेत. त्यांचा चिपळूण ते रत्नागिरी या टप्प्यातील प्रवास निश्चितच अडचणीचा होणार हे स्पष्टच आहे. सध्या असलेल्या परिस्थितीची छायाचित्रे !
rat9p19.jpg-
50110
मुंबई - गोवा महामार्गावरील सावर्डे बाजारपेठेतील रस्ता प्रवाशांसाठी सुखकारक आहे.
rat9p20.jpg-
50111
बावनदी-तळेकांटे येथे सुरू असलेले काम.
rat9p21.jpg-
50112
संगमेश्वर येथील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. याठिकाणी वाहतूक पोलीसांचीही दमछाक होते.
rat9p22.jpg-
50113
संगमेश्वर टप्प्यात धामणीनजीक महामार्गावरील रेल्वेपुलाजवळ चौपदरीकरण कसे करणार हा प्रश्नच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दुतर्फा काम सुरू आहे.
rat9p23.jpg-
N50114
संगमेश्वर येथील शास्त्री नदीवरील पुलाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
rat9p24.jpg-
50115
बावनदी येथे सुरू असलेल्या कामामुळे धुळीचा सामना करावा लागत आहे.
rat9p25.jpg-
50116
बावनदी पुलाचे काम अंतिम टप्यात. (सर्व छायाचित्रः गुरू सावंत, रत्नागिरी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

