राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी, 
सावित्रीबाई फुलेंना चौकेत वंदन

राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुलेंना चौकेत वंदन

Published on

50142

राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी,
सावित्रीबाई फुलेंना चौकेत वंदन

जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चौके ग्रामपंचायत कार्यालयात विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला सभेच्या अध्यक्षस्थानी नीरा सावंत तर प्रमुख पाहुण्या म्हणून पंचायत समिती माजी सभापती मनीषा वराडकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्यादेवी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महिला ग्रामसभेच्या सचिव भारती सुकाळी यांनी स्वागत केले. सरपंच पी. के. चौकेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून महिला दिनाचे महत्त्व सांगितले. यानिमित्त ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, विशाखा चौकेकर, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गावडे, डॉ. चैताली ढोले, आरोग्य सेविका सौ. माणगावकर, अंगणवाडी सेविका सुप्रिया गावडे, कल्याणी परब, आशा स्वयंसेविका सिद्धाली गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य जयश्री कदम, ग्रामपंचायत लिपिक सुविधा गावडे, मेघा वराडकर, श्री. मांजरेकर, दीपक चौकेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com