

50147
ग्रामीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय
दत्ता सामंत : रांगणा तुळसुलीत मंदिर सभा मंडपाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः ग्रामीण भागातील सर्व गावांचा विकास हाच शिवसेनेचा ध्यास आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व या भागाचे आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी रांगणा तुळसुली येथे केले.
तालुक्यातील भावई मंदिर रांगणा तुळसुली येथे ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारुर ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून बांधलेल्या सभा मंडपाचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी पणदूर माजी सरपंच युवा नेते दादा साईल, अरविंद करलकर, माजी सभापती नूतन आईर, सरपंच नागेश आईर, दीपक पाटकर, वामन गोडे, कविता आंगचेकर, जयश्री कोळेकर, सुभाष तुळसुलकर, प्रकाश आईर, उमेश आईर, राघो आईर आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत वाटचाल करणारा शिवसेना पक्ष ग्रामीण भागात अजूनही मजबूत आहे. विकासाने प्रेरित झालेला आणि सत्तास्थान असलेल्या शिवसेना पक्षात आज अनेक जण प्रवेश करीत आहेत. गावाच्या विकासाचा शिवसेनेने ध्यास घेतला आहे. आमदार नीलेश राणे कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत. नुकत्याच सुरू असलेल्या अधिवेशनात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह या मतदारसंघाचे विविध प्रश्न अभ्यासपूर्ण हाती घेतले आहेत. यापूर्वी अशा प्रकारचे प्रश्न विधानसभेत मांडले जात नव्हते. म्हणूनच हा मतदारसंघ गेली दहा वर्षे विकासापासून वंचित होता. आता विकास दूर नाही. गेली २५ वर्षे सरपंच नागेश आईर यांनी ग्रामपंचायत एकहाती ठेवली, हे कौतुकास्पद आहे.’ यावेळी त्यांनी मंदिराच्या सभोवताली २५ ब्रास पेव्हर ब्लॉक स्वखर्चातून देण्याचे जाहीर केले. संजय पडते यांनी, प्रशासनातील कोणता शासन निधी आपल्या गावाच्या विकासासाठी कसा आणावा, यासाठी सरपंच नागेश आईर यांचा गेल्या कित्येक वर्षांपासून अभ्यास आहे. गावाचा विकास हेच ध्येय असल्याने या गावात सर्व निवडणुकीत विजयी उमेदवारासाठी एकगठ्ठा मतदान असते, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.