भोसले नॉलेज सिटीमध्ये
महिला दिन उत्साहात

भोसले नॉलेज सिटीमध्ये महिला दिन उत्साहात

Published on

50149

भोसले नॉलेज सिटीमध्ये
महिला दिन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः भोसले नॉलेज सिटी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अॅड. अस्मिता सावंत-भोसले, उपाध्यक्षा सरोज देसाई, सचिव संजीव देसाई आणि प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक उपस्थित होत्या.
याप्रसंगी वायबीआयटी प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे आदी उपस्थित होते. २०२५ हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीचे वर्ष आहे. यानिमित्त त्यांचे जीवनकार्य नाटक स्वरूपात सादर करण्यात आले. संस्थेतील पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस विद्यार्थिनी आणि कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धा झाल्या. यामध्ये मेहंदी स्पर्धा, खडे मसाल्यांपासून दागिने बनविणे आणि पाककला स्पर्धा यांचा समावेश होता. विजेत्या स्पर्धकांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. अॅड. अस्मिता सावंत-भोसले यांनी स्त्री एक मार्गदर्शक व प्रेरणादायी व्यक्ती आहे. ती आपल्या आयुष्यात विविध भूमिका पार पाडते. या प्रत्येक भूमिकेचा आपण आदर करायला हवा, असे म्हटले. महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा उल्लेख करत भोसले नॉलेज सिटी महिलांच्या प्रगतीसाठी नेहमीच कटीबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी संजीव देसाई आणि सुनेत्रा फाटक यांनी देखील मनोगत व्यक्त केले. दुपारच्या सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यत आले. सूत्रसंचालन नमिता भोसले तर आभार प्रदर्शन मानसी कुडतरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हवाबी शेख, मानसी कुडतरकर, प्रणाली जोशी, श्रद्धा परब, अद्विका आरोलकर, स्नेहा सावंत, प्राची कुडतरकर, महादेवी मलगर, मंजुषा जामसंडेकर, प्रणाली धामणे यांनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com