स्त्रीशिवाय अवघे जगचं अपूर्ण

स्त्रीशिवाय अवघे जगचं अपूर्ण
Published on

50152

स्त्रीशिवाय अवघे जगचं अपूर्ण

मानसी परब ः ‘मानवाधिकार’तर्फे कुडाळातील महिलांचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः केवळ मानवी जीवनच नव्हे तर स्त्रीशिवाय अवघे जगच अपूर्ण आहे. मात्र, असे असतानाही केवळ महिला दिनाच्या निमित्ताने तिचा सन्मान न करता तिच्या अपार त्याग आणि कष्टासाठी अविरत तिला सन्मान व योग्य आदर मिळावा, अशी स्पष्ट भावना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. मानसी परब यांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन, सिंधुदुर्ग संघटनेतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कुडाळ येथील कष्टकरी, जिद्दी व आपल्या जगण्यातून आदर्श निर्माण करणाऱ्या माता-भगिनींचा ‘आदर्श रणरागिणी’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सौ. परब बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, ‘‘स्त्री इतरांच्या सुखासाठी आयुष्यभर तडजोड करते. कुटुंबाच्या प्रगतीशिल वाटचालीसाठी आजीवन झटते. स्वतःच्या भाव-भावनांना तिलांजली देऊन परपरिवाराच्या सुखासाठी अविरत श्रम करते. आई, आजी, पत्नी, बहीण, मुलगी व आदर्श गृहिणी अशा अनेकविध भूमिका बजावणारी आमच्यासाठी राबराब राबणारी खऱ्या अर्थाने ‘माता’ हे विशेषण पात्र ठराविणारी आजची महिला कोणत्याही क्षेत्रात आघाडीवरच दिसते. कुडाळ शहरात विविध ठिकाणी पोटाची भूक शमविण्यासाठी अत्यंत कष्टातून संसार चालवणाऱ्या अलका कलकुटे, दीपश्री तवटे, समीक्षा राव, मोहिनी शृंगारे, सविता चव्हाण या लघु उद्योजिका तसेच कुडाळ शहरातील यशस्वी महिला उद्योजिका सुनेत्रा भोगटे यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी, महिला जिल्हाध्यक्षा सौ. मानसी परब, सचिव विनोद जाधव, उपाध्यक्ष आनंद कांडरकर, व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन संघटना सिंधुदुर्गचे सोशल मीडिया प्रमुख प्रा. रूपेश पाटील, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप सुकी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष ॲड. राजेंद्र खानोलकर, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, सदस्य साबाजी परब, सदस्य सौ. वैशाली रेगे, सदस्य सौ. दिक्षा सावंत, सदस्य सौ. कोमल पारकर, सिद्धी पारकर आदी उपस्थित होते.
यावेळी निवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. महादेव परब यांच्या पशुधन विकासाच्या कार्यात सातत्याने महत्वाची साथ देणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती तथा सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व परफेक्ट अकॅडेमीचे संचालक प्रा. राजाराम परब यांच्या आई सौ. पार्वती महादेव परब यांचाही ‘आदर्श माता’ म्हणून सन्मान झाला. कुडाळ पोलिस स्टेशन येथे उपस्थित उपविभागीय पोलिस अधिकारी कांबळे, पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर यांनाही गौरविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com