

50138
रेल्वे गाड्यांमध्ये परप्रांतीयांची
मुजोरी खपवून घेणार नाही
आबा चिपकर : सहकाऱ्यांनाही धडा शिकवू
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ : तुतारी एक्स्प्रेसमध्ये खायचे पदार्थ विकणाऱ्या स्थानिक महिलांना परप्रांतीय व्यावसायिकांकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यांना रेल्वे गाड्यांमध्ये पदार्थ विकण्यास मज्जाव केला जात आहे, असे प्रकार खपवून घेतले जाणार नसून, त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचा इशारा ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी राजाराम ऊर्फ आबा चिपकर यांनी दिला आहे.
चिपकर म्हणाले, ‘‘कोकणातून जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या तसेच तुतारी एक्स्प्रेसमध्ये काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांमध्ये स्थानिक महिला खायचे पदार्थ विक्री करतात. त्यांना हॉकर्स संघटनेचा परवानाही आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकात बिर्याणी विक्री करणाऱ्या एका स्थानिक महिलेला कुडाळमधील पदार्थ विक्री करणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकाकडून धमकी दिली जात आहे. त्यांना गाड्यांमध्ये विक्रीस मनाई केली जात आहे. या परप्रांतीय व्यावसायिकांना अधिकारी व अन्य काहींचा पाठिंबा असल्याने त्यांची रेल्वे गाड्यांमध्ये मुजोरी वाढली आहे. असे प्रकार शिवसेना खपवून घेणार घेणार नाही. स्थानिकांना रेल्वे गाड्यांमध्ये विक्री करण्यास विरोध केल्यास त्यांच्यासह त्यांना सहकार्य करणाऱ्यांना धडा शिकवू. स्थानिक महिला व व्यावसायिकांवर अन्याय सहन करणार नाही. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर स्थानिकांना व्यवसाय करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे चिपकर यांनी म्हटले आहे. परप्रांतीयांकडून स्थानिकांवर अन्याय होत असेल तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही चिपकर यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.