आंबडोस येथे नारीशक्तीचा जागर
50156
आंबडोस येथे नारीशक्तीचा जागर
महिला दिन उत्साहात ः विविध स्पर्धा, कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ ः आंबडोस व्हाळवाडी (ता. मालवण) येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक महिलांच्या सत्कारासह वाडीतील महिला, मुलींचे दिवसभर विविध स्पर्धात्मक कार्यक्रम झाले. कार्यक्रम अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई दळवी यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
यावेळी ज्येष्ठ महिला लक्ष्मीबाई दळवी, अशोक परब, आशालता परब, ग्रामपंचायत सदस्य सतीश दळवी, ग्रामपंचायत माजी सदस्य विजया साळगावकर, शिक्षक देवेंद्र गोलतकर, वैष्णवी पाटकर आदी उपस्थित होते. लक्ष्मीबाई दळवी यांचा विजया साळगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक अशोक परब, आशालता परब या दाम्पत्याला सन्मानित केले.
या कार्यक्रमाला सरपंच सुबोधिनी परब यांनी भेट देत समाधान व्यक्त केले. व्हाळवाडी येथील महिलांनी संघटित होत साजरा केलेल्या महिला दिन कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी समृद्धी दळवी, नेहा चव्हाण, सत्यवती फाटक, रिया इंदुलकर, सुखदा परब, निशा परब, दीपिका नके, दीपाली परब, चंद्रकला परब, अंगणवाडी सेविका निकिता परब, सायली साळगावकर, रेश्मा साळगावकर, प्रतिभा चव्हाण, अदिश्री करावडे, भाग्यत्री दळवी, सुहासिनी दळवी, सुरेखा साळगावकर, नीलिमा साळगावकर, मिताली परब, काजल परब, पूजा दळवी, काव्या चव्हाण, पूनम परब, सुवर्णा परब, निधी इंदुलकर आदी महिला, युवती व मुली उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी वाडीतील ग्रामस्थ नीलेश चव्हाण, आर्यन साळगावकर, मथुरेश दळवी, सुभाष परब, संजय इंदुलकर, गीतू सावंत, रामकृष्ण परब, एकनाथ साळगावकर, विजय करावडे, प्रकाश साळगावकर, विश्वनाथ करावडे, हरिश्चंद्र परब, नारायण परब यांनी सहकार्य केले.
...............
विजेत्यांचा गौरव
दुपारी ३ वाजल्यापासून ९ वाजेपर्यंत विविध करमणुकीचे कार्यक्रम झाले. उखाणे, गाणी सादर झाली. बादलीत बॉल टाकणेमध्ये दीपिका नके, चंद्रकला परब, लहान गटात पूजा दळवी, तनिष साळगावकर, धनश्री साळगावकर, ग्लास लावणेमध्ये रिया इंदुलकर, निकिता परब, सायली साळगावकर, लहान गटात पूजा दळवी, काजल परब, काव्या चव्हाण, वाटाणे उचलणेमध्ये कल्याणी सावंत, सायली साळगावकर, लहान गटात काजल परब, काव्या चव्हाण, सुईत धागा ओवणे स्पर्धेत सुखदा परब, सानिका भोसले यांनी यश मिळविले. गाण्यांची भेंडी विजेता गट सुगंधा गट, मेणबत्ती पेटवणेमध्ये कल्याणी सावंत, अफसाना भाभी, संगीत खुर्चीमध्ये सुहासिनी दळवी, भाग्यत्री दळवी, लहान गटात काजल परब, मिताली परब अशाप्रकारे विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

