

देवराईच्या जमिनीसाठी आज रत्नागिरीत घंटानाद
महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे आंदोलन; देवस्थानच्या नावावर करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः कोकणातील अनेक देवस्थानांच्या देवराई तथा देवरहाटी जमितीच्या सातबारा उताऱ्यामधून कमी करण्यात आली आहेत. यासाठी कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. या देवराई देवस्थानांच्या नावावर कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि समस्त मंदिर विश्वस्त भाविक-भक्त हिंदू यांच्यावतीने उद्या (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
देवराई किंवा देवराहाटी या जमिनी केवळ धार्मिक उपासनेसाठी नव्हे तर पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी देखील आवश्यक आहेत. अनेक वर्षापासून या जमिनी देवस्थानांच्या ताब्यात होत्या आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या धार्मिक भावना आणि परंपरा जपल्या जात होत्या. मात्र शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा स्थानिक जनतेची कोणतीही समुपदेशन प्रक्रिया न करता या जमिनी शासनाच्या नावे केल्यामुळे ग्रास्थांच्या धार्मिक व सांस्कृतिक हक्कांचे उल्लंघन जाळे असून या बाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. देवराई तथा देवरहाटी जमिनी पूर्ववत देवस्थानांच्या नावे करण्यात याव्यात, या मागणीसाठी रत्नागिरी येथे रविवारी घंटानाद आंदोलन करणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक संजय जोशी यांनी दिली.
चौकट
धार्मिक महत्व असलेले पवित्र उपवन
कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात मोठा प्रमाणात देवराई तथा देवऱ्हाटी असून ते धार्मिक महत्व असलेले पवित्र उपवन असते. या देवराई त्यामधील स्थापित असलेल्या देवांच्या नावावर असतात. या जमिनी पारंपारिक स्वरुपात देवस्थानांच्या अधिपत्याखाली असून त्या धार्मिक व सांस्कृतिक दृष्टीने अत्यांत महत्वाच्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.