महिला सन्मानाची सुरुवात स्वतःपासून करा ःगायत्री साळवी
rat९p४०.jpg.
२५N५०२२५
राजापूर ः कर्तृत्वान महिलांचा गौरव करताना सरपंच गायत्री साळवी आणि मान्यवर.
महिला सन्मानाची सुरुवात
स्वतःपासून करा ः साळवी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १० ः सर्वच क्षेत्रामध्ये आज महिला कार्यरत आहेत. प्रत्येकाने महिला सन्मानाची सुरुवात स्वतःपासून करून महिलांची चळवळ अधिक गतीमान केली पाहिजे. तरच, महिला आत्मनिर्भय होतील, असे प्रतिपादन तळवडेच्या सरपंच गायत्री साळवी यांनी केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तळवडे ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील विविध क्षेत्रात काम करीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला तळवडेच्या सरपंच सौ. साळवी यांच्यासह उपसरपंच यशवंत साळवी, ग्रामविकास अधिकारी मंगेश जाधव, पोलिस पाटील शितल कोटकर ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, बचत गट सदस्य यांच्यासह मोठ्यासंख्येने महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायतीच्यावतीने संजीवनी रायबागकर, रंजना गुरव, जागृती चव्हाण, संजीवनी गोसावी, नम्रता रबसे, गायत्री मोरे, धनश्री रबसे, विजया किंजळसकर, श्रृती साळवी, अनिता पराडकर या सर्वांचा सत्कार करण्यात आला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

