परसातील बागकाम उपक्रम शाळांत पडला मागे
परसातील बागकाम उपक्रम शाळांत पडला मागे
शिक्षण विभागाकडून ‘त्यांचे’ कौतूक ; अडचणीवर मात करून उपक्रम राबवा
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १०: परसातील बागकाम या उपक्रमांतर्गंत मुलांना शेती कामाची व कष्ट करण्याची आवड निर्माण व्हावी या हेतुने शाळेत फुलबाग,औषधी वनस्पती, भाजी व फळभाजी आदींची लागवड करून दैनंदिन जीवनात त्याचा वापर करावा, असा उद्देशआहे. मात्र शिक्षकांची कमतरता, कार्यानुभव विषयात अन्य विषयाचा झालेला अंतर्भाव, जागा व पाण्याची टंचाई आदीं कारणांनी हा उपक्रम मागे पडला आहे. याला अपवाद ठरली ती माखजन न्यू इंग्लीश स्कूल ही माध्यमिक शाळा.
‘परसबागेतील भाज्या पोषण आहारात’ या शिर्षकाखाली ‘सकाळ’मध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी घेतली. त्यांनी असे विधायक उपक्रम शाळांशाळामध्ये अमलात आणुन त्यांना योग्य प्रसिद्धी देण्याचे आवाहन जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना केले आहे. सध्या सुरु असलेल्या शालेय वेळात्रकात कार्यानुभव विषयाला तासिका आहेत. या तासिका मधून शंभरहुन आधिक व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या कौशल्यापैकी एक वा दोन उपक्रम शिकवावेत, जेणे करून विद्यार्थी त्यांच्या जीवनात त्याचे उपयोजन करु शकेल असे शासन परिपत्रकात नमुद आहे. शालेय पोषण आहारात स्थानिक भाज्यांचा समावेश करावा असा शासन आदेश आहे. त्या अनुषंगाने कांही शाळांनी शाळेच्या पडिक जागेत विद्यार्थ्यांच्या मदतीने भाज्या पिकवणे, त्यांचा आहारात वापर करणे व उर्वरित भाज्यांची विक्री करणे आदी उपक्रम सुरु केले आहेत.
-----
आर्थिक बचतीचा मार्ग
सर्व शाळांनी शालेय पोषण आहारात भाज्या वापरण्यास सुरूवात केली तर मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण होईल आणि आहारासाठी लागणारी भाजी विकत आणावी लागणार नाही. त्यामुळे आर्थिक बचतही होईल, असा संदेश यावेळी देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

