शेतकऱ्यांचा वाहनांवर जाणूनबुजून कारवाईचा आरोप

शेतकऱ्यांचा वाहनांवर जाणूनबुजून कारवाईचा आरोप

Published on

शेतकऱ्यांचा वाहनांवर जाणूनबुजून कारवाई
सुधीर शिंदे यांचा आरोपः आरटीओविरोधात आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः वाहनांची कागदपत्रे असतानाही किरकोळ कारणे दाखवून शेतकऱ्यांच्या वाहनांवर आरटीओ (प्रादेशिक परिवहन)अधिकारी जाणूनबुजून कारवाई करीत असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी केला आहे. हा त्रास त्यांनी थांबवावा अन्यथा त्यांच्याविरोधात शेतकऱ्यांसह आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
याबाबत पत्रकारांना माहिती देताना शिंदे म्हणाले की, शहरासह तालुक्याला लागणारा भाजीपाला मोठयाप्रमाणात घाटमाथ्यावरून येथे येतो. स्थानिक शेतकरीही आपल्यापरिने काही भाज्यांचे उत्पादन घेऊन ते विक्रीसाठी येथे आणतात. भाजीपाला पिकवण्यापासून ते अगदी विक्रीसाठी बाजारपेठेत आणण्यापर्यंत शेतकऱ्यांना मोठे कष्ट घ्यावे लागतात. सध्याची बाजारपेठेची अवस्था व त्यातून मिळणारे पैसे याचा विचार करता अनेक शेतकऱ्यांनी नफा मिळावा म्हणून कर्जावर भाजीची वाहतूक करण्यासाठी वाहने घेतली आहेत. त्याचे हप्ते फेडताना त्यांच्या नाकीदम येत आहे. त्यामुळे शेतकरी संकटांत आहेत.
भाजीची वाहतूक करणारी वाहने आरटीओ अधिकारी जाणूनबुजून अडवतात. ती अडवताना समोर उभे न राहता आड मार्गाला लपून बसून वाहने अचानक थांबवतात. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटण्याचा धोकाही अधिक असतो. वाहने थांबवल्यानंतर कागपत्रांची मागणी केली जाते. सर्व कागदपत्रे दाखवल्यानंतर ती पूर्ण असल्याची खात्री झाल्यावर वाहनात अधिक वजनाची भाजी आहे. याचबरोबर अन्य किरकोळ कारणे पुढे करीत १८ ते २० हजार रूपये इतका दंड आकारला जातो. त्यामुळे आधीच संकटात असलेले हे शेतकरी आणखीनच संकटात येत आहेत. त्यामुळे कागदपत्रे नसताना कारवाई करण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र नाहक कारवाई त्रासदायक ठरत असून आरटीओ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विचार करावा अशी त्यांना विनंती आहे. तरीही त्यांनी आपल्या वागण्यात बदल केला नाही तर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com