व्ही.आय. कंपनी - विक्रेत्यामध्ये खेडमध्ये वाद

व्ही.आय. कंपनी - विक्रेत्यामध्ये खेडमध्ये वाद
Published on

व्ही.आय. कंपनी - विक्रेत्यामध्ये खेडमध्ये वाद
सीम कार्ड, बॅलन्स विक्री थांबवली; ग्राहकांची अडचण
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ९ : खेड शहर व ग्रामीण भागातील ग्राहक एका वेगळ्याच समस्येने ग्रासलेले दिसून येतात. खेड शहर व ग्रामीण भागात नेटवर्क असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापनाच्या कारभारामुळे ग्राहकांना कंपनीचे नवीन सीम कार्ड व नित्याचा लागणारा बॅलन्स मिळेनासा असा झाला आहे. त्यामुळे ग्राहक वर्गातून मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.यापुढे व्ही.आय. कंपनीचे एकही सीम कार्ड किंवा बॅलन्स विक्री न करण्याचा ठराव विक्रेत्यांनी केला.
खेड शहरात व्ही. आय कंपनीचे काम करणारे अनेक अधिकृत विक्रेते आहेत. परंतु कंपनी व्यवस्थापनाने अचानक या शहरात काम करणाऱ्या एका डिस्ट्रीब्यूटरला बदलल्यानंतर तालुक्यात नवीन सीम कार्ड व बॅलन्सची कमतरता भासू लागली. त्यामुळे भरणे येथील भक्ती मोबाईल चे मालक शैलेश खेडेकर यांनी कंपनी व्यवस्थापनाकडे यासंदर्भात विचारणा केल्यानंतर त्यांना समाधानकारक उत्तर मिळोले नाही. मुकादम झेरॉक्स या विक्रेत्यांनी देखील बॅलन्स संदर्भात फोन केला असता त्याना असाच अनुभव आला. त्यामुळे या ठिकाणी असलेले विक्रेते व कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. खेड शहरात व्ही. आय कंपनीचे नवीन सीम कार्ड आणि बॅलन्स मिळत नसुन, कंपनी प्रशासनाच्या विरोधात स्थानिक विक्रेत्यांनी एल्गार पुकारून कालपासून प्रत्येक विक्रेत्याच्या मोबाईल मधील व्ही.आय. चा ॲप डिलीट करून बैठक घेऊन जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली. विक्रेत्यांनी कंपनी व्यवस्थापनाचे मुख्य अधिकारी अमित दुबे यांच्याकडे अधिकाऱ्यांच्या विरोधात लेखी तक्रारी करून यापुढे व्ही.आय. कंपनीचे एकही सीम कार्ड किंवा बॅलन्स विक्री न करण्याचा ठराव केला असून तसे पत्र प्रसिद्धी माध्यमांकडे सुपूर्द केले. व्ही.आय. कंपनी व्यवस्थापन आणि खेडमधील विक्रेते यांच्यात झालेल्या वादामुळे ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे ग्राहक वर्गातून मोठी नाराजी पसरली आहे.

कोट
यासंदर्भात आम्ही सर्व विक्रेत्यांची एक बैठक आयोजित केलेली असून त्या बैठकीमध्ये झालेल्या सर्व गोष्टींवर चर्चा करून आम्ही यावर तोडगा काढणार आहोत. विक्रेते किंवा ग्राहकांना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.
- सागर भोंडे ,कंपनी व्यवस्थापनाचे एरिया सेल्स मॅनेजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com