-रत्नागिरीः क्राईम
राजधानी एक्स्प्रेसमध्ये
महिलेच्या बॅगची चोरी
रत्नागिरी, ता. ९ः कोकण रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेची बॅग चोरट्याने पळविली. त्यामध्ये रोख रक्कम ३५ हजार व ४ हजाराची हॅण्ड बॅग असा ३९ हजाराचा मुद्देमाल होता. शहर पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १३ फेब्रुवारी पहाटे तीन ते पाच या वेळात रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रवासी महिलाही राजधानी एक्स्प्रेसमधून दिल्ली ते गोवा असा प्रवास करत असताना त्यांच्या रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान झोपेचे फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्याकडील बॅग पळविली.
------
दुचाकीच्या धडकेत
दोनजण जखमी
रत्नागिरी ः शहरातील एमआयडीसी येथे रस्त्याच्याकडेला लाईटच्या पोलखाली दुचाकी उभीकरुन पत्नीशी बोलणाऱ्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात दोघे जखमी झाले. संशयित स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अमित सुभाष सागवेकर असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना १८ फेब्रुवारीला सांयकाळी साडेसातच्या सुमारास एमआयडीसी लायन्स क्लबच्या समोर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नरेंद्र धर्मा साळुंखे (वय ३८) हे एमआडीसी येथील रस्त्याच्याकडेला पोलखाली दुचाकी (क्र. एमएच-०८ ई ९१२५) पार्क करुन पत्नीशी बोलत उभे होते. त्यावेळी अमित सागवेकर यांच्या दुचाकीची (क्र. एमएच ४६ एक्स १९६६) धडक बसली. या अपघातात फिर्यादी साळुंखे व त्यांची पत्नी सौ.आरती साळुखे दुखापत झाली.
-------
दोन मोटारींचे
अपघातात नुकसान
रत्नागिरी ः पावस ते रत्नागिरी रस्त्यावरील फणसोप हायस्कूल समोरील स्पिड ब्रेकरवर दोन मोटारीमध्ये धडक झाली. या अपघातातील संशयित मोटार चालकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अक्षय सतीश सुर्यवंशी (वय २६) असे संशयित मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना २८ फेब्रुवारीला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फणसोप हायस्कूल समोरील रस्त्यावरील स्पीड ब्रेकर येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार प्रेम रजनीकांत पवार हे मोटार (क्र. एमएच-०८ एएक्स ९८३०) घेऊन रत्नागिरी ते पावस असे प्रवासी घेऊन जात असताना फणसोप हायस्कूल येथे आले असताना पाठीमागून येणाऱी मोटार (क्र. एमएच-१४ डी एन ३११४) वरील संशयित चालक अक्षय सुर्यवंशी याने धडक दिली.
----
गावखडी येथे
एकाला मारहाण
पावस ः गावखडी ग्रामपंचातीच्या समोर विषय मिटवायचा होता तर बैठक का घेता असे भाष्य करणाऱ्याला नऊ जणांनी मारहाण केली. या प्रकरणी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. संतोष सन्मुख तोडणकर, आकाश अशोक तोडणकर, अक्षय अशोक तोडणकर, अनिकेत अशोक तोडणकर, ऋतिक दिवाकर सुर्वे, निनाद प्रकाश पाटील, शुभंम दिगंबर पाटील, साईऱाज राजेश मयेकर व अर्जुन संतोष तोडणकर अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना २८ फेब्रुवारीला सायंकाळी सहाच्या समोर अनिकेत मुड्ये जवळ गावखडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुगंध मधुकर पाटील (वय ४२) हे ग्रामपंचायत कार्यालयातून बैठक संपवून लोक बाहेर येत असताना पाटील म्हणाले की, विषय मिटवायचा होता तर बैठक का घेता असे मोठ्याने बोलल्याचा राग संशयिताना आला व त्यांनी लाकडी स्टंप व बांबूने फिर्यादी सुंगध पाटील यांना मारहाण केली. या प्रकरणी पाटील यांनी पुर्णगड पोलिसात तक्रार दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

