रासायनिक कारखान्याच्या भूखंडामध्ये भीषण आग

रासायनिक कारखान्याच्या भूखंडामध्ये भीषण आग
Published on

५०२२४

रासायनिक कारखान्याच्या भूखंडामध्ये भीषण आग
लोटे औद्योगिक वसाहत ः लाखो रुपयांचे साहित्य खाक
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ९ : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक केमिकल कंपनीच्या नावे असलेल्या बंद भूखंडामध्ये रविवारी दुपारी दोन वाजता आग लागली. यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. दीड तासांनी लोटे औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन यंत्रणेच्या जवानांना ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. एक एकरामध्ये कोणताही कारखाना अस्तित्वात नसल्यामुळे जीवितहानी टळली.
गेली कित्येक वर्षे हा भूखंड रिकामाच पडून आहे. यामध्ये ना कोणत्या प्रकारचा कारखाना उभारला गेला किंवा रोजगार निर्मिती झाली. ही जागा संबंधित मालकाने लगतच असलेल्या एका कारखान्याला आपले साहित्य ठेवण्यासाठी भाड्याने दिला. अशावेळी त्या साहित्याची काळजी घेणे किंवा प्लॉटमधील सुकलेले गवत काढून टाकणे ज्यामुळे आग लागणार नाही, ही जबाबदारी त्या भूखंडाच्या मालकाची असते. ही काळजी न घेतल्याने त्या ठिकाणी आग लागून लाखाोंचे साहित्य जळून खाक झालेच त्याचबरोबर शेजारच्या रिकाम्या प्लॉटमध्येही आग पसरली. सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आणि पाठीमागच्या बाजूला असलेल्या घरडा केमिकल्स आणि यूएस विटामिन या कारखान्याच्या भूखंडाला हानी पोहोचली नाही. यावेळी पंचक्रोशीतील संतप्त ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आणि त्या केअर टेकरला धारेवर धरले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनोज आंब्रे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

कोट
एमआयडीसीकडून घेतलेला हा भूखंड गेली कित्येक वर्ष रिकामाच आहे. येथे ना कोणता कारखाना आला ना कोणती रोजगारनिर्मिती झाली. छोट्या-छोट्या प्रकल्पासाठी एमआयडीसीने तुम्ही किती रोजगार निर्माण करणार आहात, असा प्रश्न विचारला जातो मग या भूखंडाच्या मालकाला हा प्रश्न का विचारला जात नाही. त्याच्यावर कारवाई का करण्यात येत नाही.
- मनोज आंब्रे, ग्रामपंचायत सदस्य आवाशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com