चार्मिंग लेडी स्पर्धेत शर्मिला केळुसकर विजेती
50289
चार्मिंग लेडी स्पर्धेत शर्मिला केळुसकर विजेती
पाककला स्पर्धेत मंजिरी प्रथम; ‘मिळून साऱ्याजणी’चा पुढाकार
कणकवली, ता. १० : महिलांची बुद्धीमत्ता आणि त्यांच्यातील कलागुणांचे सादरीकरण असलेली चार्मिंग लेडी स्पर्धा, विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव, पाककला स्पर्धा आणि लहानथोर महिलांच्या धम्माल सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळून साऱ्याजणींचा महिला दिन कणकवलीत पार पडला. यातील चार्मिंग लेडी स्पर्धेत शर्मिला केळुसकर विजेत्या ठरल्या. तर पाककला स्पर्धेत मंजिरी वारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
येथील मातोश्री मंगल कार्यालयात या स्पर्धा झाल्या. माजी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आदींनी शुभेच्छा दिल्या.
चार्मिंग लेडी स्पर्धेत मृणाली आजवेलकर उपविजेत्या ठरल्या. तृतीय क्रमांक पूनम हजारे तर उत्तेजनार्थसाठी सुप्रिया सरंगले आणि श्वेता घाणेकर यांची निवड झाली. या स्पर्धेचे परीक्षण समृद्धी पेटकर यांनी केले. चार्मिग लेडी स्पर्धेत स्वप्नाली साबळे, सान्वी सावंत, वैष्णवी काणेकर, निकिता चव्हाण, दया कांबळे, क्षमा धानजी, अक्षता कोदे, सुरेखा कट्टीमणी, ममता सर्पे यांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पाककला स्पर्धा झाली. यात द्वितीय क्रमांक विनिता वरूणकर, तृतीय क्रमांक नेहा शंकरदास तर उत्तेजनार्थ क्रमांकासाठी उज्वला धानजी आणि दीपा कलिंगण यांच्या पाककृतीची निवड झाली. महिला दिनानिमित्त श्री माऊली महिला उद्योग कळसुली गावडेवाडी या समुहातील अमृता पाडावे, कोमल राऊत, स्वप्नाली राऊत, प्रियजा राऊत, ऋुतुजा पाडावे, सुवर्णलता सावंत यांचा सत्कार झाला. तर विविध क्षेत्रात या कर्तृत्वाची चमक दाखविणाऱ्या प्रज्ञा वालावलकर (शैक्षणिक कार्य), निशा केळुसकर (रेसिपी), शर्मिला केळुसकर (एनसीसी ऑफिसर), पूजा बाणावलीकर (पती निधनानंतर रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करत आपल्या दोन्ही मुलांना उत्तम शिक्षण देणाऱ्या) आणि सदिच्छा सावंत (डिझायनिंग क्षेत्र) या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.
महिला दिनाच्या कार्यक्रमात रूचिरा वर्णे, शीतल सापळे, राधा कृशे, श्वेता घाणेकर, सविता सुतार, नीता भडंग यांनी बहारणार गायन केले. तर सुप्रिया सरंगले यांनी एकपात्री नाटिका सादर केली. वर्षा करंबेळकर लिखित मालवणी नाटिकामध्ये तेजल लिंग्रस, नीता मयेकर, रोहिणी पिळणकर, दिव्या साळगावकर, सुमेधा काणेकर, शिल्पा सरुडकर, शितल सावंत, नेहा पारकर, मनीषा शिरसाट, प्रियांका सापळे, नेहा पारकर, मधुरा पालव यांनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

