‘अबू आझमींचे विधानसभा सदस्यत्व तत्काळ रद्द करा’
50292
‘अबू आझमींचे विधानसभा
सदस्यत्व तत्काळ रद्द करा’
कणकवलीत सकल हिंदू समाजाची मागणी
कणकवली, ता.१० : औरंगजेबाची भलावण करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी येथील सकल हिंदू समाजाने केली आहे. याबाबतचे निवेदन समाजाच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, ‘‘अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर विधानसभा आवारात, प्रसार माध्यमांशी बोलताना औरंगजेब बादशाह उत्तम शासक होता. तो क्रूर नव्हता, असे विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनी केले होते. हे विधान सामाजिक समरसता बिघडवणारे आहे. तरी त्यांचे विधानसभा सदस्यत्व कायमचे रद्द व्हावे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.’’ निवेदन देताना नांदगाव सरपंच भाई मोरजकर, प्रदीप हरमलकर, राजू तांबे, कृष्णा वायंगणकर, हेमंत वायंगणकर, शुभंम देसाई, कमलाकर पाटील, श्रीराम मोरजकर, मारुती मोरये, संदीप पाटील, अनंत परब, बापू पोकळे, तुषार कुडतरकर, प्रकाश खरात आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

