कणकवलीत उद्यापासून नाट्य प्रशिक्षण शिबिर
कणकवलीत उद्यापासून
नाट्य प्रशिक्षण शिबिर
कुडाळ, ता. १० ः महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १२ ते २१ या दहा दिवसांच्या कालावधीत कणकवली येथे नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.
रंगभूमीचे जतन व संवर्धन करून नवीन कलाकार तयार व्हावेत, नवोदित कलाकारांना नाटकाच्या तंत्राचा अभ्यास व्हावा, योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा व त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांच्या नियोजनाखाली बुधवारपासून (ता. १२) शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरासाठी मर्यादित जागा असून १४ ते ४० वर्षे वयोगटातील नवोदित कलाकारांना या प्रशिक्षणाचा मोफत लाभ घेता येईल. नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ नाट्य कलावंत, तंत्रज्ञ, लेखक हे मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत. प्रशिक्षणानंतर महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी सादरीकरणाची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तरी या नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेसाठी प्रवेश मर्यादित असल्याने लवकरात लवकर नोंदणी करून या ठिकाणी प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन ‘अक्षरसिंधु’चे शिबिर संचालक विजय चव्हाण, संजय राणे, प्रा. हरिभाऊ भिसे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

