पिंगुळीत आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन पिंगुळीत आजपासून जयंती, वर्धापन सोहळा
टीपः swt१०८.jpg मध्ये फोटो आहे.
प. पू. राऊळ महाराज, अण्णा महाराज
पिंगुळीत आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन
अण्णा महाराजांची जयंती ः गुरुवारपर्यंत भक्तिमय वातावरणात सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचे शिष्य विनायक (अण्णा) महाराज पिंगुळी यांचा ८० वा जयंती उत्सव व गौरीशंकर मंदिराचा ३० वा वर्धापन दिन सोहळा ११ ते १३ मार्च या कालावधीत भक्तिमय वातावरणात होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
मंगळवारी (११) पहाटे ५.३० वाजता नित्य काकड आरती, सकाळी ७ ते ९ समाधी पूजन, सार्वजनिक अभिषेक, ९ वाजता राऊळ महाराज समाधीस्थानी लघुरुद्र, दुपारी १२.३० वाजता महाराजांची महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ४ वाजता गायनाचा कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता द्वादशीनिमित्त पालखी मिरवणूक सोहळा, रात्री ९ वाजता महाप्रसाद, १० वाजता भाऊ नाईक (वेतोरे) यांचे कीर्तन. बुधवारी (१२) पहाटे ५.३० वाजता नित्य काकड आरती, सकाळी ७ वाजता समाधी पूजन, सार्वजनिक अभिषेक, दुपारी १२.३० वाजता महाराजांची महाआरती, १ वाजता व रात्री ८ ते १० पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, ७ वाजता नित्य सांजआरती, रात्री ८ वाजता राऊळ महाराज भक्त मंडळ (मुंबई) यांचे भजन, ८.३० वाजता भाग्योदय मित्रमंडळ गांगोची राई, कसाल यांच्या दिंडीचे आगमन, १० वाजता श्री देव वेतोबा रवळनाथ बालगोपाळ मित्रमंडळ कुशेगाव-परुळे (ता. वेंगुर्ले) यांचे गोफनृत्य, १२ वाजता विनायक अण्णा महाराज यांचा जयंती उत्सवास प्रारंभ. गुरुवारी (१३) कार्यक्रमाच्या मुख्य दिवसानिमित्त पहाटे ५.३० वाजता नित्य काकड आरती, सकाळी ७ वाजता समर्थ राऊळ महाराज समाधी पूजन व समाधीकडे सार्वजनिक अभिषेक, ७.३० वाजता गौरीशंकर मंदिराचा ३० वा वर्धापन दिन, गौरीशंकर मंदिरात लघुरुद्र, १०.३० वाजता विनायक (अण्णा) राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी व रोटरी कल्याण मंडळ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्णबधिर तपासणी शिबिर, १०.३० वाजता प. पू. विनायक (अण्णा) महाराज पादुका पूजन, महाआरती, दुपारी १२ वाजता ४५ दिव्यांग लाभार्थींना मोफत कृत्रिम जयपूर फूटचे वाटप, १२.३० वाजता सद्गुरू राऊळ महाराज समाधीस्थानी ‘श्रीं’ची महाआरती, १ पासून अखंड महाप्रसाद, १ वाजता सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ मुंबई यांचे भजन (बुवा-श्रीकांत शिरसाट), २ वाजता विनायक अण्णा महाराज जन्मोत्सव, ३.३० वाजता श्री भालचंद्र बाबा प्रासादिक भजन मंडळ जानवली (ता. कणकवली) यांचे भजन (बुवा-शशिकांत राणे), दुपारी ४.३० वाजता श्री नामदेव महाराज भजन मंडळ सिंधुदुर्गतर्फे नामस्मरण, सायंकाळी ६ वाजता श्री रामेश्वर संयुक्त संगीत भजन मंडळ वेंगुर्ले यांचे भजन, ७ वाजता सांजआरती, रात्री ८ वाजता श्री विठ्ठल-रखुमाई वारकरी भजन मंडळ कालवी बंदर (ता. वेंगुर्ले) यांचे भजन, १० वाजता श्री मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ (मोरे, ता. कुडाळ) यांचा ‘उद्धार भैरवाचा’ अर्थात ‘देवी वैष्णवी’ हा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

