तरुणांनी साकारली कोलकाता बोटीची प्रतिकृती
-rat१०p२३.jpg-
२५N५०३४४
रत्नागिरी : भाट्ये येथे ड्रीम मॉडेल क्राफ्टतर्फे बनवण्यात आलेल्या कोलकाता बोटीच्या प्रतिकृतीसह तरुण.
-----
तरुणांनी साकारली लढाऊ कोलकत्ता बोटीची प्रतिकृती
सुमारे १५ फूट लांब ; मुंबईत पश्चिमी बेडा येथे पाठवणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : रत्नागिरीतील तरुणांनी शिप मॉडेलिंग विषयात आवड दाखवत भारतीय नौसेनेची कोलकाता बोटीची सुमारे पंधरा फूट लांब आकाराची प्रतिकृती तयार केली. ही बोट मुंबईत पश्चिमी बेडा (फ्लॅग ऑफिसर नेव्हल कमांड ऑफिस) येथे पाठवली जाणार आहे.
ड्रीम मॉडेल क्राफ्ट या फर्मचे प्रमुख मयूर वाडेकर हे चांदेराई रत्नागिरी येथील रहिवासी असून, शिप मॉडेलिंगमध्ये अनेक वर्ष काम करत आहेत. त्यांच्या टीमने १५ दिवसरात्र मेहनत करून कोलकाता या लढाऊ बोटीची प्रतिकृती तयार केली. ही प्रतिकृती तयार करण्यासाठी वाडेकर यांना नीलेश मिस्त्री (वांद्री), गणेश पांचाळ (निवळी), महेंद्र कोलगे (कोतवडे) यांनी सुतारकामासाठी मदत केली. तसेच संदेश जाधव व पांडुरंग बाईत यांनी सॅडिंग व फॅब्रिकेशनचे काम पाहिले. फहद लाला, यश डोंगरे, निहारिका राऊत यांनी मरिन फिटिंग व मदतनीस म्हणून काम पाहिले. रेडियमसाठी दानियल सारंग यांनी सहकार्य केले. शिर्के प्रशाला, गोगटे-जोगळेकर कॉलेजच्या एनसीसी कॅडेट्स यांनीही शिप बनवण्यासाठी सहकार्य केले. भाट्ये येथे कोलकाता लढाऊ बोट पाहण्यासाठी विद्यार्थी, नागरिकांनी गर्दी केली.
---------
कोट
शिप मॉडेलिंग या विषयात कोकणचा मोठा वाटा गेली अनेक वर्षे भारतीय नौदलात राहिला आहे. यापूर्वी देखील भारतीय नौदलात कोकणात तयार करण्यात आलेल्या बोटींचा समावेश होता. हे लक्षात ठेवून कोकणातील तरुणांनी याकडे करिअर म्हणून देखील पाहिले पाहिजे.
- मयूर वाडेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

