लक्ष्मीपूजनादिवशी विराजमान श्री गणरायाचे थाटात विसर्जन
50392
लक्ष्मीपूजनादिवशी विराजमान
श्री गणरायाचे थाटात विसर्जन
उभादांडा मंदिरातील आगळीवेगळी परंपरा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १० ः दीपावली लक्ष्मीपूजनादिवशी विराजमान झालेल्या उभादांडा येथील श्री गणेश मंदिरातील गणपतीचे होळी पौर्णिमेअगोदर रविवारी (ता. ९) रात्री तब्बल साडेचार महिन्यांनी ढोलताशांच्या गजरात, भजनाच्या साथीने भाविकांच्या उपस्थितीत सागरेश्वर समुद्रात विसर्जन करण्यात आले.
उभादांडा येथील हे गणेश मंदिर शंभर वर्षांहून अधिक जुने आहे. येथे आगळीवेगळी प्रथा आहे. मंदिरात केवळ साडेचार महिने गणपतीची मूर्ती बसविली जाते. अन्य दिवशी येथे गणपतीच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. प्रतिवर्षी दीपावली लक्ष्मीपूजनादिवशी गणपती विराजमान होतो आणि त्यानंतर होळी पौर्णिमेच्या अगोदर त्याचे विसर्जन होते. मंदिरात दररोज भजने, नाटक, वार्षिक जत्रा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. रविवारी रात्री भजन, आरतीनंतर भक्तिमय वातावरणात सागरेश्वर किनारी गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

