

-rat१०p३४.jpg-
२५N५०३८०
दापोली ः हर्णैच्या समुद्रकिनाऱ्यावर अजूनही सीगल पक्ष्यांचे थवे.
-rat१०p३५.jpg -
२५N५०३८१
भरदुपारी कडक उन्हाचे चटके बसत असल्याने दापोलीतील स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्यावर सन्नाटा होता.
----
तापमानवाढीने दापोलीतील पर्यटनाला फटका
दुपारी रस्त्यावर शुकशुकाट ; सीगल पक्षीही परतीच्या वाटेवर, तापमान ३७ अंशावर
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १० ः मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीतील पारा ३५ ते ३७ अंशात राहिला आहे. त्याचा परिणाम नागरी जीवनावरच नव्हे तर पशुपक्ष्यांवर झाला आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत हवेत गारवा असतो तर त्यानंतर उन्हाच्या झळांना सुरवात होते. परिणामी, दापोलीतील रस्ते दुपारी सुनसान होतात. दहावी, बारावीच्या परीक्षांबरोबरच कडाक्याच्या उन्हामुळेही पर्यटकांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. हिवाळा संपत आल्याचे संकेत मिळू लागल्याने समुद्रकिनाऱ्यावर दिसणाऱ्या सीगल पक्ष्यांच्या संख्येतही घट होऊ लागली आहे.
दापोलीत पारा रात्री १० अंशाखाली तर दिवसा ३५ ते ३७ अंशापर्यंत वर जात आहे. मागील २४ तासात कमाल तापमान ३६.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १०.० अंश सेल्सिअस इतके आहे. सकाळी साधारण नऊ वाजेपर्यंत थंडी त्यानंतर कडाक्याचे ऊन अशी स्थिती आहे. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत कडक उन्हाचे चटके सहन करावे लागतात. गेल्या वर्षी याच दरम्यान कमाल तापमान ३३.५ तर किमान तापमान १३.५ अंश सेल्सिअस होते.
गेल्या १० ते १५ वर्षांमध्ये निसर्गसौंदर्याने नटलेले येथील डोंगर जंगलतोडीमुळे उघडे पडू लागले आहेत. त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळू लागला असून, मिनी महाबळेश्वर तापू लागले आहे. येथील तापमान आता ४० अंश डिग्रीपर्यंत जात असल्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. हिवाळा सुरू झाला की, परदेशातून कोकणात येणाऱ्या सीगल पक्ष्यांच्या वास्तव्यावरही उष्म्याचा परिणाम झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी थंड वातावरणामुळे सीगल पक्षी किनाऱ्यावर येतात त्यानंतर ते किनाऱ्यावरील सुरूबनात निघून जातात. मागील आठवड्यात हर्णै, मुरूड, पाळंदे या किनाऱ्यांवर सीगल पक्ष्यांचे प्रमाण कमी दिसत होते. कदाचित ते उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल लागल्यामुळे परतीच्या प्रवासाला लागले असावेत, अशा अंदाज व्यक्त केला जात आहे.
----
ब्रिटिशांच्या छावण्या
एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ब्रिटिशांनी मिनी महाबळेश्वरात आपल्या सैनिकी छावण्या थाटल्या होत्या. दापोली हे कोकणातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते. दापोलीचे निसर्गसौंदर्य, थंड हवा, शांत समुद्रकिनारा ब्रिटिशांना भावल्याने दापोलीला छावणीचे रूप आले होते. दापोलीतील आझाद मैदान व आजूबाजूच्या परिसरात ब्रिटिश सैन्य व अधिकाऱ्यांच्या छावण्या होत्या. त्यामुळे याच मिनी महाबळेश्वरचे नाव ब्रिटिशकाळात पूर्वी कॅम्प दापोली म्हणून सुद्धा प्रचलित होते. ब्रिटिशकाळात दापोली शहरात पालिका होती; परंतु ग्लोबल वॉर्मिंगचा फटका या मिनी महाबळेश्वरला बसलेला आहे.
--------
चौकट
दापोलीतील तापमान
*तारीख* कमाल (अं. से.)* किमान (अं. से.)
* १ मार्च* ३५.३* १५.३
* २ मार्च* ३५.५* १४.७
* ३ मार्च* ३५.४* १५.२
* ४ मार्च* ३६.४* १३.९
* ५ मार्च* ३६.०* १४.०
* ६ मार्च* ३६.२* १०.७
* ७ मार्च* ३५.३* १०.३
* ८ मार्च* ३७.०* १०.६
* ९ मार्च* ३५.३* ९.८
----------
कोट
उष्णतेच्या लाटेचा परिणाम पशूपक्ष्यांच्या जीवनावरही होत असतो. सीगलसारखे अन्य भागातून आलेले पक्षी हिवाळा संपला की, हळूहळू परतीच्या प्रवासाला लागतात. मार्च महिन्यानंतर पक्ष्यांची संख्या कमी होऊ लागली की, लक्षात येते. त्या पक्ष्यांना परतीचा प्रवास करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळाली की, त्यांचा प्रवास सुरू होतो. एप्रिल, मेपर्यंत त्यांचा परतीचा प्रवास सुरू राहील.
- मृगांक प्रभू, पक्षी अभ्यासक
------------
कोट
राजस्थान आणि काश्मिरच्या सीमेवर सध्या बर्फवृष्टी होत आहे, अशी बर्फवृष्टी कधी होत नाही. आता सूर्य पृथ्वीच्या जवळ येत असल्यामुळे सध्या उष्णता वाढू लागली आहे. तरीही उत्तरेत सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे रात्री आणि सकाळी वातावरण थंड राहते.
- विजय मोरे, हवामान विभाग, कोकण कृषी विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.