नाणोसच्या सरपंचांविरोधात
१९२ जणांनी केले मतदान

नाणोसच्या सरपंचांविरोधात १९२ जणांनी केले मतदान

Published on

नाणोसच्या सरपंचांविरोधात
१९२ जणांनी केले मतदान

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः नाणोस (ता.सावंतवाडी) ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचांविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी घेतलेल्या अविश्वास ठरावावर आज झालेल्या मतदान प्रक्रियेत १९२ जणांनी विरोधात तर २२ जणांनी बाजूने मतदान केले. त्यामुळे हा ठराव सदस्यांच्या बाजूने पारित करत सरपंच पदाचा चार्ज आता उपसरपंचांकडे दिला आहे. याबाबतची माहिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी दिली.
नाणोस संरपचांच्या कारभाराविरोधात सातपैकी सहा सदस्यांनी अविश्वास ठराव घेतला होता. या ठरावानुसार आज ग्रामंचायत नाणोस येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी ठरावाच्या अनुषंगाने झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये सुरुवातीला सदस्यांचे मतदान घेण्यात आले. यावेळी विरोधात असलेल्या सहापैकी सहा सदस्यांनी सरपंचाविरोधातच मतदान केले. त्यानंतर ग्रामस्थांचे मतदान झाले. यामध्ये एकूण २२० पैकी १९२ इतके मतदान सरपंचांविरोधात झाले. केवळ २२ जणांनी सरपंचांच्या बाजूने मतदान केले. झालेल्या मतदानापैकी सहा मते बाद ठरली. ही संपूर्ण प्रक्रिया मत पत्रिकेद्वारे घेण्यात आली. त्यामुळे सरपंचांविरोधात घेण्यात आलेला ठराव ग्रामसभेत पारित करत सरपंचपदाचा ताबा उपसरपंचांकडे देण्यात आला. आता सरपंचपदाची फेर निवडणूक होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी नाईक यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com