सिंधुदुर्गात गुरुवारपासून होळी उत्सवास प्रारंभ
50412
जिल्ह्यात गुरुवारपासून होळी उत्सवाचा जल्लोष
पोलिस प्रशासन सज्ज ः ५३८ सार्वजनिक तर ५९८ खासगी ठिकाणी होणार पूजन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः जिल्ह्यात होळी उत्सवाला गुरुवारपासून (ता.१३) प्रारंभ होत असून जिल्ह्यात ५३८ सार्वजनिक तर ५९८ खासगी अशा एकूण ११३६ ठिकाणी होळीचे पूजन होणार आहे. या कालावधीत येथील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, होलिकोत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.
जिल्ह्यात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मोठ्या संखेने चाकरमानीही दाखल होत असतात. या वर्षीचा होळी उत्सव १३ पासून सुरू होत आहे. काही गावात पाच, सात तर त्यापेक्षाही अधिक दिवस हा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी जिल्ह्यात ५३८ सार्वजनिक तर ५९८ खासगी अशा एकूण ११३६ ठिकाणी होळीचे पुजन केले जाणार आहे. काही गावात मानपानावरुन वाद होण्याची शक्यता असते. ज्या गावात वाद आहेत, अशा गावात वाद मिटविण्याच्या दृष्टीने पोलिस आणि महसूल प्रशासनातर्फे प्रयत्न केले जातात. यासाठी संबंधित मानकरी, ग्रामस्थांच्या बैठका घेऊन समन्वय साधला जातो. यामध्ये शेवटपर्यंत तडजोड न झाल्यास त्या ठिकाणी कार्यक्रमास निर्बंध घातले जातात. ज्या गावांमध्ये मानपानावरून वाद आहेत अशा ठिकाणी तूर्त निर्बंध घालण्यात येणार आहेत. तहसील स्तरावर हे वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरू असून त्यातील काही गावांमध्ये वाद मिटण्याची शक्यता आहे, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. मोठ्या प्रमाणात चाकरमानीही दाखल होऊ लागले आहेत. या उत्सव कालावधीत गावागावात रोंबाट, रंगपंचमी आणि वेगवेगळ्या वेशभूषातील नाच गाणी (खेळ) हे वेगळेच आकर्षण असते. एकूणच हा उत्सव चांगल्या वातावरणात साजरा व्हावा, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये या दृष्टीने पोलिस प्रशासन सज्ज झाले असून हा उत्सव शांततेत व आनंदी वातावरणात पार पाडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
-----------------
(ग्राफ देतोय)
सार्वजनिक होळ्या
दोडामार्ग-५२
बांदा-२६
सावंतवाडी-४०
वेंगुर्ले-२७
निवती-१२
कुडाळ-९१
सिंधुदुर्गनगरी-९
मालवण-५९
आचरा-२१
कणकवली-६७
देवगड-६७
विजयदुर्ग-२५
वैभववाडी-३८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

