सावंतवाडी रुग्णालयातील असुविधांप्रश्नी मनसे आक्रमक

सावंतवाडी रुग्णालयातील
असुविधांप्रश्नी मनसे आक्रमक
Published on

50415

सावंतवाडी रुग्णालयातील
असुविधांप्रश्नी मनसे आक्रमक

वैद्यकीय अधीक्षकांशी चर्चा; कामकाज सुधारण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप करत आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीषकुमार चौगुले यांना जाब विचारला. यावर रुग्णालयीन कामकाजात सुधारणा आणू, अशी ग्वाही डॉ. चौगुले यांनी दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत रुग्णालयात दोन रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. पण, एकाच रुग्णवाहिकेत डॉक्टर उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते, याबाबत वरिष्ठांचे लक्ष वेधावे. गर्भवतींवर शस्त्रक्रिया केली जाते, त्यातील काही महिलांना इन्फेक्शन झालेले आहे, असे सांगितले. त्यावेळी डॉ. चौगुले यांनी असे चार रुग्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये मिळाल्यानंतर तातडीने ऑपरेशन थिएटर दोन दिवस बंद ठेवले होते. त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी सर्व स्वच्छता करून ते चालू करण्यात आले. त्यामुळे यापुढे पुन्हा अशी घटना घडणार नाही याची काळजी घेऊ, असे श्री. चौगुले यांनी सांगितले. रुग्णालयातील बाहेरील शिकाऊ डॉक्टरांना मराठी भाषेबाबत सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. डायलिसिस सेंटरमध्ये प्रतीक्षा यादीत रुग्णांना थांबाव लागते त्यावर त्यांनी जिल्हा नियोजनमधून एक डायलिसिस सेंटर मशिनरी मंजूर आहे. लवकर ती कार्यान्वित होणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, शहराध्यक्ष ॲड. राजू कासकर, उपतालुकाध्यक्ष अतुल केसरकर ,राजेश मामलेकर, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊळकर, मळगाव विभागीय अध्यक्ष राकेश परब आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com