इन्फिगो फाउंडेशनतर्फे महिलांनी घेतले ज्वेलरी प्रशिक्षण
-rat१०p५.jpg-
P२५N५०२९७
रत्नागिरी : इन्फिगो फाउंडेशतर्फे आयोजित ज्वेलरी प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अश्विनी करकरे, मेधा खांडेकर.
-------
़''इन्फिगो’तर्फे महिलांना दिले ज्वेलरी प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : इन्फिगो फाउंडेशनतर्फे मुंबईच्या प्रसिद्ध ज्वेलरी मेकर्स अश्विनी करकरे व मेधा खांडेकर यांनी साळवी स्टॉप येथील इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये शहरी व ग्रामीण भागातील महिलांना ज्वेलरी मेकिंगचे प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी डॉ. शीतल साळुंखे, डॉ. तन्वी कुरेशी आणि सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे उपस्थित होत्या. डॉ. शीतल यांनी सर्व महिलांना डोळ्यांसंदर्भातील उपयुक्त माहिती दिली. करकरे यांनी महिलांना प्रोत्साहन देत उत्तम प्रकारे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाध्ये हार, बांगड्या, कानातले यांचे उत्तम प्रशिक्षण दिल्यानंतर सर्व महिलांनी स्वतः वस्तू बनवल्या. पुढे देखील अद्ययावत प्रशिक्षणाचा कार्यक्रम इन्फिगो फाउंडेशनतर्फे व करकरे यांनी घ्यावा, असा आग्रह धरला. त्यांच्या सूचनेप्रमाणे पुन्हा कार्यक्रम घेऊ, असे इन्फिगो फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले. या सामाजिक उपक्रमास प्रतिसाद दिल्याबद्धल डॉ. अश्विनी रहाटे, श्रद्धा भागवत, नूतन सुर्वे व सर्व टीमने आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

