आभार संस्थेचा महिलांना प्रेरणा देणारा उपक्रम
-rat१०p९.jpg-
२५N५०३५७
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ महिला शाखेमार्फत आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गायिका संध्या सुर्वे.
--------
‘आभार’चा प्रेरणा देणारा उपक्रम
संध्या सुर्वे ः महिलांसाठी फनी गेम्स
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : आभार संस्थेचे उपक्रम प्रेरणादायी असतात. आता महाराष्ट्रातील पहिले महिलांना प्रेरणा देणारे पारंपरिक नमन अशा अनेक उपक्रमांना या मंडळाने सर्वच क्षेत्रात केलेल्या उपक्रमाने स्पर्श करणे प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन गायिका, संगीत विशारद संध्या सुर्वे यांनी केले.
आभार संस्था संचलित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ महिला शाखेमार्फत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन व फनी गेम्सचे आयोजन उद्यमनगर येथील बाळासाहेब ठाकरे उद्यानात केले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी प्रमुख पाहुण्या माजी नगराध्यक्षा राजेश्वरी शेट्ये, ऐश्वर्या कीर, मंगला नलावडे, माजी उपनगराध्यक्ष वंदना देसाई, इंदुलकर, माजी जि. प. सदस्या योगिता वाकडे, भजन मंडळाच्या अध्यक्षा प्रेरणा विलणकर, साईनाथ नागवेकर, शरद गोळपकर, नमनसम्राट यशवंत वाकडे उपस्थित होते.
या वेळी महिला भजन मंडळाचा व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. महिलांसाठी फनी गेम्स स्पर्धा घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. सूत्रसंचालन समिक्षा वालम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मानसी साळवी, वेदा शेट्ये, पूनम गोळपकर, आकांक्षा वायंगणकर, अर्चना मयेकर, शीतल सकपाळ, गीता भागवत आदीनी मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

