बियाणी बालमंदिरमध्ये सरपंच ममता जोशी यांचा सत्कार

बियाणी बालमंदिरमध्ये सरपंच ममता जोशी यांचा सत्कार

Published on

-rat१०p१७.jpg-
२५N५०३३८
रत्नागिरी : बियाणी बालमंदिरात सरपंच ममता जोशी यांचा सत्कार करताना राजेंद्र कदम. सोबत मान्यवर
---------

सरपंच ममता जोशी यांचा सत्कार
बियाणी बालमंदिरात पाककला स्पर्धा ; महिला दिनाचे औचित्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : जागतिक महिला दिनानिमित्त बियाणी बालमंदिर येथे महिला दिनानिमित्त पोमेंडी बुद्रुकच्या सरपंच ममता जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
बालमंदिरात पालक भगिनींसाठी भरड धान्यापासून पदार्थ बनवण्याची पाककला स्पर्धा घेण्यात आली. उल्का पटवर्धन व मीनल सरदेशपांडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. बक्षीस वितरण जोशी यांच्या हस्ते झाले. यात प्राची बिर्जे, श्रद्धा शिरधनकर, निधी खेर, शुभांगी वाघमारे, गीतांजली गुर्जर, ऋतुजा आंबेकर, आरोही वाडकर या विजेत्यांना गौरवण्यात आले.
दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी देशातील उत्कृष्ट उल्लेखनीय काम करणाऱ्या निवडक महिला सरपंचांना केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यात ममता जोशी यांचा समावेश होता. जोशी व पती अंकुश जोशी हे भारत शिक्षण मंडळाच्या विजू नाटेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी. महिला दिनाचे औचित्य साधून शालेय समितीतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला शालेय समिती अध्यक्ष राजेंद्र कदम, विनायक हातखंबकर, सदस्य संजय चव्हाण, ऋतुजा आंबेकर, अंकुश जोशी, मुख्याध्यापिका धनश्री मुसळे आदी उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com