

अत्याचाराविरोधात लढण्यासाठी सक्षम बना
श्रद्धा कळंबटे ः मुलींच्या मातांचा कुवारबावमध्ये सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : आज महिलांची छेडछाड, अत्याचार, घरगुती वाद, कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्या विरोधात लढण्यासाठी महिलांनी आत्मनिर्भरतेने स्वयंसिद्धा होणे काळाची गरज आहे, प्रतिपादन स्वयंसेतू संस्थेच्या संचालिका श्रद्धा कळंबटे यांनी केले.
कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला विभागाने जागतिक महिलादिनानिमित्त महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. कुटुंबात केवळ मुलींच्या जन्माचे स्वागत करणाऱ्या मातांचा या वेळी त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्या जयश्री जोशी होत्या. कोणत्याही संकटात असलेल्या महिला ज्येष्ठ नागरिक, अत्याचारग्रस्त व्यक्ती, त्यांच्या मदतीला धावून जाणारी महाराष्ट्र पोलिसदलाची ११२ क्रमांकाची हेल्पलाइन उपलब्ध असून त्यावर संपर्क साधल्यास पोलिस तत्काळ मदतीला धावून येतात, असे कळंबटे यांनी सांगितले.
डॉ. सपना करे यांनी महिलांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी आयुर्वेदिक उपचार महत्त्वाचे असल्याचे विशद केले. सुवर्णा चव्हाण यांनी प्रास्ताविक, गौरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. संयोजन शुभांगी भावे, वृषाली घाणेकर आणि वंदना कोतवडेकर यांनी केले. स्नेहल वैशंपायन यांनी आभार मानले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.