रत्नागिरी- दिव्यांग मुलांची सेवा अशीच चालू ठेवा

रत्नागिरी- दिव्यांग मुलांची सेवा अशीच चालू ठेवा

Published on

-rat१०p२६.jpg-
२५N५०३४७
रत्नागिरी : महिलादिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना उपजिल्हाधिकारी वंदना खरमाळे. सोबत अॅड. विनय आंबुलकर, दिलीप रेडकर, पूर्वा पेठे आदी.
--------------
दिव्यांगांची सेवा अशीच सुरू ठेवा
वंदना खरमाळे ः आशादीप संस्थेत महिला दिनी सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : दिव्यांग मुलांसाठी आशादीपमध्ये ज्या महिला योगदान देतात व देत आहेत त्याची तुलना कोणत्याही बाबींशी होऊ शकत नाही. दिव्यांग मुलांसाठी करावयाची कामे सर्वसाधारण असामी सहसा स्वीकारत नाहीत. तुम्ही करत असलेली सेवा अशीच अविरत सुरू ठेवावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी वंदना मांडगे-खरमाळे यांनी केले.
एमआयडीसीतील आशादीप दिव्यांग मुलांच्या रत्नागिरी येथील संस्थेमध्ये महिलादिन साजरा करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. रोजच्या ताणतणावातून आणि स्वतःचा संसार सांभाळून आशादीप मतिमंद मुलांसाठी आपला वेळ देऊन काम करणाऱ्या सर्व महिलांचा सन्मान यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी आशादीपचे संस्थापक ट्रस्टी व व्यवस्थापकीय संचालक दिलीप रेडकर, अध्यक्ष ॲड. विनय आंबुलकर, ट्रस्टी श्रीमती शामल शेठ, पूर्वा पेठे उपस्थित होत्या. आशादीपचे संस्थापक दिलीप रेडकर यांनी केवळ मानधनांवर काम करणाऱ्या संस्थेच्या सर्व सेवेकरी महिलांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन आशादीपच्या स्मिता जडे व रसिका बोरकर यांनी केले. आशादीपचा इतिहास, भविष्यातील वाटचाल याबाबतची माहिती आशादीपचे अध्यक्ष ॲड. विनय आंबुलकर यांनी दिली.
------
दानशुरांना आवाहन

आशादीपमध्ये दिव्यांग मुलांचे संगोपन व निवासी स्वयंरोजगार केंद्रासाठी जागा कमी पडत आहे. याकरिता आशादीपने नवीन नियोजित बांधकाम सुरू करण्याचा संकल्प केला आहे. समाजातील विविध स्तरांतील असामींनी या कामी साहाय्याची हमी दिली आहेच. तरी देखील सध्याच्या परिस्थितीचा व बांधकामाच्या साहित्यदरामध्ये झालेली वाढ विचारांत घेता निधीची कमतरता पडत आहे. त्यामुळे दानशुरांनी इमारतीकरिता हातभार लावावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com