वेर्लेत भाजपकडून विकासकामे
50431
वेर्लेत भाजपकडून विकासकामे
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. १० ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेर्ले-सटवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा प्रारंभ भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
रस्त्याचा हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे सटवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मडगावकर यांनी वेर्ले गावाच्या विकासासाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे तसेच भाजपा व जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी भाजप आंबोली मंडल उपाध्यक्ष सुभाष राऊळ, वेर्ले सरपंच रुचिता राऊळ, माजी सरपंच बाबा राऊळ, ग्रामपंचायत सदस्य स्नेहा राऊळ, भगवान राणे, विलास राऊळ, यशवंत राऊळ, गंगाराम राऊळ, गोविंद राऊळ, तुकाराम बिडये, चंद्रकांत राऊळ, अनंत राऊळ, न्हानू राणे, रामा राणे, गोपाळ राणे, महादेव राणे, नारायण ठाकूर, शांताराम सावंत, भिवा कदम आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

