

50446
भिरवंडे रामेश्वर मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी पायाभरणी
शोभायात्रेने रंगत; गंगा, युमुना, सरस्वती, नर्मदा, गोदावरीचा जलाभिषेक
कनेडी,ता. १० ः भिरवंडे रामेश्वर मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी आज येथे पायाभरणी आणि कोनशिला पूजन तसेच कलश शोभायात्रेचा कार्यक्रम उत्साहात झाला. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ढोल ताशाच्या गजरात शोभायात्रा पार पडली.
भिरवंडे रामेश्वर मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. दोन मजली आरसीसी इमारत आणि दगडी कळसाचे बांधकाम करण्यासाठी आज श्रीगणेश मंदिर ते रामेश्वर मंदिर अशी कलश शोभायात्रा काढण्यात आली. कलश शोभायात्रेसह ढोलपथक, लेझीम पथक, वारकरी दिंडी तब्बल दोन तासाचा हा कार्यक्रम झाला. शोभायात्रेने या कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत हा सोहळा साजरा करण्यात आला. पुरोहितांनी आज सकाळी विधिवत पूजेला सुरुवात केली. प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वतीचे पवित्र जल, नर्मदा परिक्रमेचे पवित्र जल आणि त्र्यंबकेश्वर येथील गोदावरीची पवित्र जल आणले होते. या पवित्र जलाने रामेश्वराच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी भिरवंडे गावातील ग्रामस्थांसह महिपाळगड, जत, सांगली, पुणे, मुंबई तसेच राज्याच्या इतर भागातून अनेक भाविक यात सहभागी झाले होते. माजी आमदार वैभव नाईक, सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ आणि मराठीचे अभ्यासक प्राध्यापक जी.ए. सावंत, सावंत पटेल समाजातील १४ गावचे मानकरी, कलबिस्त, चौकूळ, मसुरे, मालवण अशा विविध भागांमध्ये वास्तव्यात आलेली भिरवंडे ग्रामस्थांनी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला. महाप्रसादाचे वाटप तसेच सायंकाळी भजन आणि आरती झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.