रत्नागिरी-जिल्ह्यात आजपासून सक्रिय क्षयरोग शोधमोहीम

रत्नागिरी-जिल्ह्यात आजपासून सक्रिय क्षयरोग शोधमोहीम

Published on

जिल्ह्यात आजपासून क्षयरुग्ण शोधमोहीम

रत्नागिरी, ता. १० : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातंर्गत १० ते २२ मार्च या कालावधीत जिल्ह्यातील अतिजोखीम भागामध्ये सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे नियोजन केले आहे.
या मोहिमेंतर्गत संशयित क्षयरुग्णांचे थुंकी नमुने व क्ष-किरण तपासणी मोफत करून निदान निश्चितीनंतर त्यांच्यावर मोफत औषोधोपचार सुरू करणे हे मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला, ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवरील गाठ अशा लक्षणांबाबत विचारणा करण्यात येणार आहे. यापैकी लक्षणे आढळल्यास तो संशयित क्षयरुग्ण म्हणून ओळखला जाईल व त्याचे दोन थुंकी नमुने घेऊन व एक्स-रेकरिता संदर्भित करून तपासणीअंती निदान निश्चिती करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गावडे यांनी दिली आहे. नागरिकांनी घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आवश्यक योग्य ती माहिती देऊन क्षयरोग शोधमोहीम यशस्वी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com