क्राईम
उक्षीत नारळांची चोरी
रत्नागिरी ः तालुक्यातील उक्षी-मातोश्री फार्महाऊस येथील नारळाच्या झाडाचे ६ हजार ७५० रुपयांचे २५० नारळांची चोरट्याने चोरी केली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. ९) पहाटे अडीच ते साडेतीनच्या सुमारास उक्षी येथील मातोश्री फार्महाऊस येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदेश चंद्रकांत जोशी (वय ३९, रा. मातोश्री निवास, उक्षी जोशीवाडी, रत्नागिरी) यांचे उक्षी येथे फार्महाऊस आहे. चोरट्याने त्यांच्या फार्महाऊसमधील २० नारळाच्या झाडांचे ६ हजार ७५० रुपयांचे २०० ते २५० नारळ चोरून नेले. या प्रकरणी जोशी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
---
कर्नाटक तरुणाची
आत्महत्या
रत्नागिरी ः शहरातील मारूती मंदिर येथील नवकार प्लाझा येथील कर्नाटकमधील तरुणाने गळफास घेतला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. प्रदीप धर्माप्पा बल्याणअली (वय ३४, रा. नवकार प्लाझा, मारूती मंदिर, रत्नागिरी. मुळ ः कर्नाटक) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १०) सकाळी सव्वादहाच्या पूर्वी निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप याने रूमच्या छताच्या फॅनला साडी बांधून आत्महत्या केली. शेजारील दीपेश श्रीपत मांडवकर यांनी खिडकीतून पाहिले असता प्रदीप गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. तत्काळ त्यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
----
विजेच्या खांबाला
डंपरची धडक
रत्नागिरी ः तालुक्यातील खालगाव-धामणेवाडी येथील इलेक्ट्रिक डीपी रस्त्यावर डंपर निष्काळजीपणे चालवून डीपी व लोखंडी खांबाचे नुकसान केले. या प्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ फेब्रुवारीला दुपारी पावणेएकच्या सुमारास धामणेवाडी येथील इलेक्ट्रिक डीपीच्या ठिकाणी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात डंपर चालकाने डंपर निष्काळजीपणे चालवून खालगाव धामणेवाडी येथील इलेक्ट्रिक डीपी मोबाईल टॉवर येथील जाड्या केबलला धडक देऊन इलेक्ट्रिक डीपी व लोखंडी पोलचे नुकसान केले. या प्रकरणी साहाय्यक पोलिस फौजदार महेश टेमकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
---
सार्वजनिक ठिकाणी
मद्य पिणाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील देवूड लावगण येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या वृद्धाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय सदाशि देसाई (वय ६१) असे संशयित वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रिया सुर्वे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
-----
शहरातील वृद्धाचा
आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः शहरातील पांडवनगर येथील वृद्धाला चक्कर आलेल्या उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोहनसिंह मकनसिंह दसाणा (वय ४९, रा. गोविंद अपार्टमेंट, पांडवनगर, रत्नागिरी. मुळ ः राज्यस्थान) हे सकाळी नेहमीप्रमाणे आंघोळ करून कपडे घालत असताना त्यांना अचानक चक्कर आली. नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
-----
नेपाळी तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी ः शहराजवळील शिरगाव-आडी येथे आंबा-काजूच्या बागेत काजूच्या झाडाखाली बेशुद्धावस्थेत आढळलेल्या नेपाळी तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. भीमबहाद्दूर बम (वय ३५, रा. साडेपाणी, कैलाली-नेपाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ९) घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भीमबहाद्दूर बम हे आडी येथील आंबा-काजूच्या बागेत बेशुद्धावस्थेत आढळले. खबर देणार यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

