कसब्यात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे

कसब्यात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे

Published on

-rat१०p४५.jpg -
P२५N५०४६७
संगमेश्वर ः तालुक्यातील कसबा येथील सरदेसाई यांचा वाडा.
-----------
छत्रपती संभाजीराजेंचे भव्य स्मारक व्हावे
प्रमोद जठार ः ५० एकरात नियोजन व्हावे, आज बलिदान दिवस
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : छत्रपती संभाजी महाराजांनी ११ मार्च १६८९ मध्ये बलिदान दिले. मंगळवारी (ता. ११) महाराजांचा बलिदान दिवस आहे. त्यांना कसबा (ता. संगमेश्वर) येथे एकत्र येऊन स्मरण करतो वंदन करतो. या धर्मरक्षकाची शपथ घेऊन महाआरती होते. सर्व लोकप्रतिनिधी आणि शिवप्रेमींची मागणी आहे की, या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईज म्हणजे त्यागाचे सर्वोच्च प्रतीक म्हणजे संभाजी महाराज आहेत. त्यांचे ५० एकरामध्ये भव्य स्मारक व्हावे अशी शपथ घेणार आहोत, अशी माहिती भापचे नेते प्रमोद जठार यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, उद्या सकाळी १० वाजता संगमेश्वर हायवेपासून कसब्यापर्यंत महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रॅलीने जाऊ. तिथे त्यांना वंदन करून महाआरती होते. त्यांच्या केलेल्या कामाचे स्मरण होते. या कार्यक्रमाला उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, आमदार शेखर निकम, आमदार निलेश राणे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, आमदार भैय्या उर्फ किरण सामंत आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत.
या निमित्ताने मला सांगायचे आहे की, स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईट म्हणजे त्यागाचे सर्वोच्च प्रतीक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत. त्यांचे थोड्या थोडक्या नाही तर ५० एकरामध्ये स्मारक व्हावे यासाठी आम्ही तिथे शपथ घेणार आहोत. यापूर्वीच मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक कसब्यात होणार असल्याचे घोषित केले आहे. अर्थमंत्री अजित पवार देखील या स्मारकासाठी भरीव निधी देतील, असा विश्वास व्यक्त करून सर्व शिवप्रेमींनी सकाळी १० वाजता संगमेश्वरला यावे असे आवाहन जठार यांनी केले.
-----
कसबावासीयांकडून स्वागत
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कसबा-संगमेश्वर येथे ज्या वाड्यात वास्तव्यासाठी होते, तो सरदेसाई यांचा वाडा छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक म्हणून घोषित केला आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. याबाबत सुभाष सरदेसाई यांनी सरदेसाई वाड्यावर स्मारक उभारण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू. सरकारने आम्हाला विश्वासात घेऊन स्मारकाची ब्ल्यु प्रिंट दाखवावी, अशी भूमिका व्यक्त केली आहे.
-----
कोट
कसबा गावात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक होत आहे, याचा आनंद आहे. या स्मारकासाठी सरपंच या नात्याने आवश्यक ते सर्व सहकार्य करू. छत्रपती संभाजी महाराज यांचे या ठिकाणी स्मारक झाल्यास पर्यटक विकास होऊन कसबा गावाचा ऐतिहासिक वारसा जगापुढे जाईल.
--पूजा लाणे, सरपंच, कसबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com