संशयास्पद दाखल्याचा चिपळूण पंचायत समितीत तपास

संशयास्पद दाखल्याचा चिपळूण पंचायत समितीत तपास

Published on

‘त्या’ दाखल्याबाबत पंचायत समितीत तपास
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता.२३ ः रत्नागिरीत सापडलेल्या बांगलादेशी महिलेने चिपळूण पंचायत समितीमधून घेतलेला जन्मदाखला पोलिसांना दिला होता. या संशयास्पद दाखल्याची रत्नागिरी पोलिसांनी चिपळूण पंचायत समितीत सोमवारी तपासणी केली. जन्मदाखला रजिस्टरमध्ये झालेल्या घोळाची दिवसभर तपासणी सुरू होती. या दाखला रजिस्टरमध्ये छेडछाड नेमका कोणी केली, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
रत्नागिरी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी चिपळूण पंचायत समितीकडे सनमा खातून बिलाल मुल्ला उर्फ सनमा राहिल बोंबल यांच्या जन्मदाखल्याची पडताळणी करण्यास कळवले होते तसेच तिच्या जन्मदाखल्याच्या रजिस्टरवरील नोदींची प्रत मागितली होती. त्यानुसार सनमा बिलाल मुल्ला यांचा जन्म सावर्डे येथे १९९४ मध्ये झाल्याची नोंद घालण्यात आली. हा जन्मदाखला १८ मार्च २०२१ रोजी चिपळूण पंचायत समितीमधून देण्यात आला. अबिदा बिलाल मुल्ला यांनी ही जन्मनोंद केली. पोलिसांच्या सूचनेनुसार, सुरवातीस पंचायत समिती प्रशासनाकडून दाखल्याची पडताळणी करण्यात आली. या जन्मदाखल्याच्या रजिस्टरची पडताळणी केल्यानंतर विविध संशयास्पद बाबी उघड झाल्या. जन्मदाखल्यावरील नोंदीतदेखील अनेक त्रुटी राहिल्या आहेत. मार्च २०२१ मध्ये पंचायत समितीमध्ये जे गटविकास अधिकारी कार्यरत होते त्यांची सही आणि प्रत्यक्षात दाखल्यावरील सही यात देखील फरक आहे. या विविध बाबींची पोलिसांनी तपासणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com